Bullet Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Bullet Train: देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार! रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Bullet Train In India: देशातील बुलेट ट्रेनबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

High-Speed Rail In India: देशातील बुलेट ट्रेनबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले हेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अहमदाबादच्या दौऱ्यावर असून, त्यांनी ही घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन (Bullet Train) 2026 मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्याचे 92 पिलर तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे. याशिवाय 199 स्थानके जागतिक दर्जाची बनवण्यासाठी मास्टर प्लॅन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जागतिक दर्जाची स्थानके मास्टर प्लॅन अंतर्गत बांधली जात आहेत

या मास्टर प्लॅन अंतर्गत अहमदाबाद (Ahmedabad) रेल्वे स्थानकालाही जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. बुलेट ट्रेनच्या या घोषणेसोबतच, रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी गुरुवारी ट्विट करुन सांगितले होते की, 'रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना अनेक सुविधा देण्याचा रेल्वे मंत्रालय प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 6105 रेल्वे स्टेशनवर लोकांना मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा डेटा 4 ऑक्टोबर 2022 पर्यंतचा आहे. त्याच वेळी, वायफायची सुविधा बर्‍यापैकी सुरक्षित आणि वेगवान आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT