iPhone|Apple|iPhone Production In India Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतात दरवर्षी होणार 5 कोटी iPhone ची निर्मिती, 50 हजार लोकांना मिळणार रोजगार

iPhone Production In India: अहवालानुसार, सध्या Apple दरवर्षी 20 कोटी आयफोन तयार करते. यातील बहुतांश उत्पादन चीनमध्ये होते.

Ashutosh Masgaunde

Production of 5 crore iPhones will be done in India every year, 50 thousand people will get employment:

अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी Apple ने येत्या दोन ते तीन वर्षात 5 कोटी आयफोन तयार करण्याची योजना आखली आहे. हे त्यांच्या एकूण वार्षिक उत्पादनाच्या 25 टक्के असेल. याचा अर्थ जगात वापरल्या जाणाऱ्या आयफोनपैकी एक चतुर्थांश आयफोन भारतात तयार केले जातील.

अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, सध्या Apple दरवर्षी 20 कोटी आयफोन तयार करते. यातील बहुतांश उत्पादन चीनमध्ये होते.

मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलू लागले असून, आता यामध्ये भारताचा वाटाही वाढू लागला आहे. प्रत्यक्षात तो सध्या ५ टक्के आहे. Apple भारतात आपल्या उत्पादन क्षमतांचा सतत प्रचार करत आहे.

Apple चे उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन या तैवानच्या कंपन्या भारतात आयफोन तयार करतात. आता या कंपन्या बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये त्यांचे नवीन प्लांट उभारत आहेत आणि आता टाटा समूहही या उत्पादन क्षेत्रात पुढे आला आहे.

खरं तर, टाटा समूहाने अलीकडेच आणखी एका तैवान कंपनी विस्ट्रॉनचा बेंगळुरू स्थित आयफोन प्लांट विकत घेतला होता.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आता टाटा समूह तामिळनाडूच्या होसूरमध्ये एक मोठा आयफोन असेंब्ली प्लांट तयार करण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये 20 iPhone असेंबली लाईन्स असतील.

याशिवाय येत्या दोन वर्षांत ५० हजार लोकांना रोजगार दिला जाणार आहे. येत्या एक ते दीड वर्षात हा प्लांट सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे Apple ची टाटासोबतची भागीदारी मजबूत होईल, ज्यांची कर्नाटकात आयफोनची फॅक्टरी आहे.

गेल्या काही वर्षांत Apple हळूहळू भारतावरील अवलंबित्व वाढवत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने भारतात $7 बिलियन पेक्षा जास्त किमतीचे आयफोन असेंबल केले, जे डिव्हाइसच्या उत्पादनाच्या सुमारे 7 टक्के होते.

यावर्षी जागतिक विक्रीच्या पहिल्याच दिवशी भारतीय बनावटीचे आयफोनही सादर करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT