Budget 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2022: 'ज्येष्ठ नागरिकांना FD वर विशेष व्याजदर द्यावा'

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव (FD) विशेष व्याजदर निश्चित करण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव (FD) विशेष व्याजदर निश्चित करण्याची विनंती केली आहे. यासोबतच टपाल बचत योजना आणि भविष्य निर्वाह निधी (PPF) मधील गुंतवणुकीची मर्यादा हटवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बचत योजनांवरील कमी व्याजदरांमुळे आज ज्येष्ठ नागरिकांकडे निवृत्ती निधी खूपच कमी आहे. यामुळे त्यांच्या खिशावर मोठा भार पडला आहे, विशेषत: कोरोना काळात, ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. (Priyanka Chaturvedi Has Demanded That Senior Citizens Should Be Given Special Interest Rates On FDs)

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यसभा सदस्य चतुर्वेदी म्हणाल्या, "सर्वसाधारण अर्थसंकल्प ही एक संधी आहे, जेव्हा सरकार अशा लोकांच्या समस्या दूर करु शकते आणि त्यांना दिलासा देऊ शकते." “वाढत्या महागाईमुळे व्याजदर सध्या खूपच कमी आहे. अलिकडच्या वर्षांत एफडीवरील व्याजदर 12 टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आला आहे. पोस्टल बचतीवरील व्याजदर 7 टक्क्यांवर आला असून गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपये आहे.

त्या पुढे म्हणाल्या की पीपीएफच्या बाबतीत, गुंतवणुकीची वार्षिक मर्यादा केवळ 1.5 लाख रुपये आहे. एवढेच नाही तर PPF व्यतिरिक्त इतरांवरही कर आकारला जातो. या पत्रात म्हटले आहे की, कमी व्याजदरामुळे आज ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपले घर व्यवस्थित चालवण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.

शिवाय, ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांच्या चिंता दूर करण्यासाठी बँक एफडीवर विशेष व्याजदर निश्चित करावा, अशी विनंती त्यांनी अर्थमंत्र्यांना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Virat Kohli: विश्वविक्रम रचण्यापासून 'किंग' कोहली फक्त एक पाऊल दूर, 'क्रिकेटच्या देवा'ला मागे टाकण्याची संधी

Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल; हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती, रविंद्र जडेजाच्या बायकोलाही मंत्रीपद

Viral Video: ट्रेनमधून जाणाऱ्या महिलेनं मोठा दगड दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर भिरकावला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

IRCTC Down: दिवाळीला गावी जायचं कसं? तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप अचानक डाऊन; प्रवाशांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT