Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज DPIIT पोस्ट बजेट वेबिनारला करणार संबोधित

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) आज होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदी वेबिनारला संबोधित करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) आज होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) वेबिनारला संबोधित करणार आहेत. डीपीआयआयटीने सांगितले आहे की, या वेबिनारचा उद्देश आर्थिक विकासाला गती देण्यासाठी समन्वय स्थापित करणे हा असणार आहे. निवेदनानुसार, पंतप्रधान गती शक्तीचे व्हिजन आणि अर्थसंकल्पाशी त्याचे अभिसरण यावर सर्व संबंधितांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या भाषणानंतर, सहभागी पाच सत्रांमध्ये भाग घेतील ज्यामध्ये देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्रातील विविध पैलूंवरती चर्चा केली जाईल. डीपीआयआयटीचे सचिव अनुराग जैन 'नेशन अ‍ॅज अ होल अ‍ॅप्रोच' या सत्राचे नेतृत्व करणार आहेत. या सत्रात गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टलवरती लक्ष केंद्रित केले जाईल, असे निवेदनात म्हटले गेले आहे. (Prime Minister Narendra Modi will address DPIIT Post Budget Webinar today)

डीपीआयआयटीचे सचिव अनुराग जैन 'नेशन अ‍ॅज अ होल अ‍ॅप्रोच' या सत्राचे देखील नेतृत्व करतील. या सत्रात गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टलवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे देखील निवेदनात म्हटले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव गिरीधर अरमाने, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री राजेश अग्रवाल (Rajesh Agarwal) आणि NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत हे देखील सहभागी होणार आहेत.

PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन ही एकात्मिक योजना आहे, जी लोकांची, वस्तूंची आणि सेवांची अखंडित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी 'अंतर' भरून काढण्याचे काम करणार आहे. राहणीमानात सुलभता वाढवणे, व्यवसाय सुलभ करणे, व्यत्यय कमी करणे आणि खर्चाच्या कार्यक्षमतेसह कार्ये जलद पूर्ण करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमावरती सरकार 107 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत, कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी 2 लाख किमी राष्ट्रीय महामार्गांचे एकात्मिक नेटवर्क तयार केले जाणार आहे. यासह, व्यवसायाला अधिक सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे 1600 दशलक्ष टन कार्गो हाताळणार आहे. याशिवाय वन सिटी, वन ग्रीडचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 35 हजार किमी परिसरात गॅस पाइपलाइनचे जाळे देखील टाकण्यात येणार आहे.

या योजनेत भारतमाला, सागरमाला, बंदरे, उडान, आर्थिक क्षेत्र, रेल्वे यासारख्या पायाभूत सुविधा योजनांचाही समावेश केला जाईल. योजनेच्या पुढील टप्प्यात रुग्णालये, विद्यापीठे यासारख्या सामाजिक पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी 220 विमानतळ, एअरड्रॉम्स आणि एअरस्ट्रिपही बांधले जातील.

गिरीधर अरमाने सागरमाला, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव, पर्वतमाला आणि PM गतिशक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल्ससह राष्ट्रीय द्रुतगती मार्ग मास्टर प्लॅनवर लक्ष केंद्रित करून 'लॉजिस्टिक इफेक्टिवनेस सक्षम करणे' या विषयावरील एका वेगळ्या सत्राचे अध्यक्षस्थान ग्रहण करतील.

राजेश अग्रवाल, सचिव, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) हे 'लॉजिस्टिक वर्कफोर्स स्ट्रॅटेजी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी वाढवणे' या विषयावरील सत्राचे अध्यक्षस्थान करणार आहेत. या सत्रात PM गतिशक्तीच्या माध्यमातून भारताच्या विकासाला गती देण्यासाठी जागतिक दर्जाची प्रतिभा निर्माण करण्याच्या मार्गांवरती चर्चा केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT