Gautam Adani | Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: हिंडनबर्ग प्रकरणी अदानी समुहाला दिलासा; प्रथमदर्शनी कोणतेही उल्लंघन नसल्याची अहवालात माहिती

यामुळे गौतम अदानी यांना हिंडनबर्ग प्रकरणी मोठा दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Adani Group: अदानी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीचा अहवाल समोर आला आहे. अहवालात प्रथमदर्शनी नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा अहवाल सार्वजनिक करण्याबाबत तज्ज्ञ समितीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, मात्र हा एक खुलासा गौतम अदानींसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

अहवालात केलेल्या खुलाशांची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गौतम अदानी यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळू शकतो असे बोलले जात आहे.

हिंडेनबर्गने 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. अहवालाच्या निष्कर्षामध्ये 88 प्रश्नांचा समावेश आहे. अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतला आहे, असा दावा अहवालात करण्यात आला होता.

त्यानंतरच दानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि काही दिवसांतच गौतम अदानी यांची कोट्यवधींचे नुकसान झाले. यावरून मोठे राजकारण देखील झाले, काँग्रेस आणि भाजप यामुळे समोरासमोर आले.

यूएस-आधारित फर्म हिंडेनबर्ग रिसर्चविरोधात एक जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली होती. जनहित याचिकेत हिंडनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने एक तज्ज्ञ समिती स्थापन केली. समितीच्या या अहवाल आता प्रथमदर्शनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे म्हटले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालातील खुलाशामुळे गौतम अदानी यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 150 डॉलर अब्जांवर पोहोचली होती. त्यावेळी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.

पण हिंडेनबर्गच्या एका अहवालाने असा धक्का दिला की सध्या गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप 20 लोकांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

दरम्यान, हिंडनबर्गने केवळ अदानी समूहाविरोधातच अहवाल सादर केला होता असे नाही तर, त्यांनी यापूर्वी, हिंडेनबर्गने जिनिअस ब्रँड, आयडियानोमिक, निकोला, एससीडब्ल्यूओआरएक्स, विन्स फायनान्स, जिनिअस ब्रँड्स, एससी रॉक्स, एचएफ फूड, ब्लूम एनर्जी, अफ्रिया, ट्विटर इंक यांसारख्या कंपन्यांविरुद्ध अहवाल सादर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT