Price Hike | Todays News Live Update  Dainik Gomantak
अर्थविश्व

खिशाला कात्री! दही, लस्सीसह अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये 18 तारखेपासून होणार वाढ

येत्या काही दिवसात तुमच्या घरातील खर्च आणखी वाढणार आहे. काही घरगुती वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

येत्या काही दिवसात तुमच्या घरातील खर्च आणखी वाढणार आहे. काही घरगुती वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. नुकत्याच झालेल्या GST कौन्सिलच्या 47 व्या बैठकीत दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवर (GST) लादण्यात आले होते. त्याचबरोबर काही वस्तूंवर जीएसटीचा दरही वाढवला आहे. (Prices of many items including curd and lassi will go up from the 18th)

मनीकंट्रोलपीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर 29 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूल सचिव तरुण बजाज (Tarun Bajaj) यांनी 18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळे 18 जुलैपासून टेट्रा पॅकसह दही, लस्सी आदी खाद्यपदार्थांच्या किमती वाढणार आहे. यासोबतच रुग्णालयामध्ये उपचार घेणेही महागणार आहे. (Todays News Live Update)

  • यापूर्वी टेट्रापॅक केलेले दही, लस्सी आणि बटर मिल्कवर जीएसटी लागू करण्यात आला नव्हता. 18 जुलैपासून यावर 5% दराने जीएसटी लागू होणार आहे.

  • चेकबुक जारी करताना बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर 18% GST आकारला जाणार आहे.

  • रूग्णालयात रु. 5,000 (नॉन-ICU) पेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या खोलीवर आता 5% GST लागू होणार आहे.

  • अॅटलससह नकाशे आणि शुल्कांवरही 12 टक्के दराने जीएसटी लागू होणार आहे.

  • दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे तसेच यापूर्वी त्यांच्यावर जीएसटी नव्हता.

  • एलईडी दिवे, एलईडी दिव्यांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

  • ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक-सर्व्हर इत्यादींवर 18 टक्के दराने जीएसटी लागू होणार आहे. सध्या त्यांच्यावर 12 टक्के जीएसटी आकारली जात आहे.

  • GST परिषदेने रोपवेद्वारे प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी GST दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के केला.

  • स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसेस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्रा-ऑक्युलर लेन्स इत्यादींवरील जीएसटी 18 जुलैपासून 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे.

  • ज्या ऑपरेटर्समध्ये इंधनाच्या किमतीचा समावेश आहे त्यांच्यासाठी मालवाहतुकीच्या भाड्यांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे.

  • संरक्षण दलांसाठी आयात केलेल्या काही वस्तूंवर 18 जुलैपासून GST लागू होणार नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT