PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Post Office Scheme: छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, मोदी सरकारने...!

Modi Government: सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा छोट्या व्यावसायिकांना होणार आहे.

Manish Jadhav

Post Office Scheme: सरकारकडून जनतेच्या हितासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनाकडून वेळोवेळी पावले उचलण्यात आली आहेत. दरम्यान, सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा छोट्या व्यावसायिकांना होणार आहे.

वास्तविक, टपाल निर्यात केंद्रांमुळे छोट्या व्यापाऱ्यांना चालना मिळणार आहे. पोस्ट ऑफिस (Post Office) निर्यात केंद्रांमुळे छोट्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर, देशाची निर्यात वाढण्यासही मदत होईल.

'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट'

टपाल विभागाचे सचिव, विनीत पांडे यांनी सांगितले की, टपाल कार्यालये त्यांच्या कमी खर्चाची रचना आणि सुलभ प्रक्रियेद्वारे लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी योग्य आहेत. पांडे पुढे म्हणाले की, विभाग आपले नेटवर्क 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट' (ODOP), छोटे व्यापारी आणि ईशान्येकडील राज्यांसाठी उपयुक्त बनवत आहे.

अमृतपेक्स-2023 द्वारे आयोजित कार्यक्रमात

इंडियन पोस्ट- अमृतपेक्स-2023 द्वारे आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, टपाल निर्यात केंद्रांमुळे छोट्या व्यावसायिकांना चालना मिळेल. याच कार्यक्रमाला संबोधित करताना उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) विभागाचे सचिव अनुराग जैन म्हणाले की, सरकार (Government) भौगोलिक संकेत (GI) सह उत्पादनांचा प्रचार करत आहे.

व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक लोकांना फायदा देत आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनही अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांद्वारे सरकार लोकांना बचत आणि गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते. आता टपाल निर्यात केंद्रातून छोट्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: डिचोलीत इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

अग्रलेख: बस स्टॉपवरील 'राडा' आणि मानवता, एका फौजीच्या वेशातील देवदूताची कथा

SCROLL FOR NEXT