Post Office Fraud Message Dainik Gomantak
अर्थविश्व

'पोस्ट ऑफिसतर्फे 6 हजार जिंकण्याची संधी!' अशी सर्वत्र चर्चा; जाणून घ्या संपूर्ण सत्य

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोस्ट ऑफिस 6 हजार रुपयांचे बक्षीस देईल असे म्हटले आहे. यानंतर पोस्ट ऑफिसने याबाबतचे निवेदन जारी केले आहे.

दैनिक गोमन्तक

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. तुम्हीही पोस्ट इंडियाचे ग्राहक असाल किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित मेसेज तुमच्याकडे येत असतील, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसने एक सूचना जारी केली आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोस्ट ऑफिस 6 हजार रुपयांचे बक्षीस देईल असे म्हटले आहे. यानंतर पोस्ट ऑफिसने याबाबतचे निवेदन जारी केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बनावट वेबसाइट आणि URL संदर्भात पोस्ट ऑफिसने एक सूचना जारी केली आहे. पोस्ट इंडियाने सांगितले आहे की त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे लकी ड्रॉ, बोनस किंवा बक्षीस आधारित सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले नाही. यासोबतच त्यांनी ग्राहकांना अशा ऑनलाईन फसवणूकीपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे.

जाणून घ्या काय आहे प्रकरण

वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून इंडिया पोस्टच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, 'लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना 6,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. हे बक्षीस जिंकण्यासाठी तुम्ही वैयक्तिक तपशील शेअर करणे आवश्यक आहे.

यानंतर पीआयबीने त्याची चौकशी केली आणि सांगितले की हा घोटाळा आहे आणि त्याचा इंडिया पोस्टशी काहीही संबंध नाही. म्हणजेच जर इंडिया पोस्टच्या लकी ड्रॉच्या नावाने मेसेज आला तर चुकूनही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: डिचोलीत जिल्हा पंचायत निवडणुक मतदानाला सुरुवात!

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

SCROLL FOR NEXT