जर तुम्हीही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य लक्षात घेऊन बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी जाणून घ्या. प्रत्येकाला छोट्या गुंतवणुकीत सुरक्षित नफा मिळवायचा असतो, यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या (Post Office) मुदत ठेव योजनेत देखील गुंतवणूक करू शकता. (Post Office FD Scheme Deposit money in this scheme you will get more profit than the bank)
एफडी मिळवण्याची सोपी प्रक्रिया
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करून तुम्हाला व्याजा व्यतिरिक्त अनेक सुविधाही मिळत असतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला नफ्यासह सरकारी हमी देखील मिळत असते. यामध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडी व्याजदराची सुविधा तिमाही आधारावर मिळते. येथे FD मिळवणे देखील सोपे आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3, 5 वर्षांसाठी FD मिळवू शकता. या योजनेत कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी घेण्याचे फायदे :
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्यासाठी सरकार हमी देत असते.
यामध्ये गुंतवणूकदारांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो.
यामध्ये एफडी ऑफलाइन (रोख, चेक) किंवा ऑनलाइन (नेट बँकिंग/मोबाइल बँकिंग) देखील करता येते.
एक किंवा अधिक एफडी करू शकता.
FD खाते देखील जॉईन करू शकता.
5 वर्षांसाठी मुदत ठेवीवर ITR दाखल करताना तुम्हाला कर सूट मिळते.
तुम्ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजरित्या एफडी ट्रान्सफर करू शकता.
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी कशी उघडायची
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्यासाठी, तुम्ही चेक किंवा रोख रक्कम देऊन खाते उघडू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येऊ शकते. कमाल रक्कम जमा करण्याची मर्यादा नाहीये.
FD वर चांगले व्याज मिळते
पोस्ट ऑफिसमध्ये 7 दिवस ते एक वर्षाच्या FD वरती 5.50 टक्के व्याज मिळते तसेच हाच व्याजदर 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर देखील उपलब्ध आहे. याशिवाय 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.50 टक्के दराने व्याज मिळत तर 3 वर्षांच्या एका दिवसापासून 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.70 टक्के व्याज उपलब्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.