Poonawala Fincorp  Dainik Gomantak
अर्थविश्व

Poonawala Fincorp चे सीईओ विजय देशवाल यांचा राजीनामा

कंपनीचे एमडी अभय भुतडा हे संस्थेच्या ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक दोन्ही गोष्टींची जबाबदारी सांभाळतील

दैनिक गोमन्तक

Poonawala Fincorp: पूनावाला फिनकॉर्पचे सीईओ विजय देशवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे असुन आता ते सायरस पूनावाला समूहामध्ये धोरणात्मक भूमिका स्वीकारतील. कंपनीच्या दिलेल्या माहिती नुसार, विजय देशवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून काम थांबवले आहे.

"आम्ही तुम्हाला कळवत आहोत की कंपनीचे (Finance Company) सीईओ विजय देशवाल यांनी सायरस पूनावाला समूहामध्ये धोरणात्मक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नवीन भूमिकेत ते गुंतवणूक संधींचे नेतृत्व करतील," असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

ऑपरेशनल आणि धोरणात्मक दोन्ही बाबींसाठी जबाबदारी

याशिवाय, कंपनीच्या सिक्युरिटीजमधील व्यवहारांची ट्रेडिंग विंडो 6 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. ही विंडो कंपनी कर्मचारी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी “कोड ऑफ कंडक्ट फॉर प्रोहिबिशन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग” (“Code of Conduct for Prohibition of Insider Trading”) नुसार बंद करण्यात आली आहे. ही विंडो 7 मार्च 2022 रोजी पुन्हा सुरु करण्यात येईल.

काय आहे पूनावाला फिनकॉर्प

पूनावाला फिनकॉर्प ही मिडकॅप गटातील एक कंपनी आहे. ही कंपनी कार, व्यावसायिक वाहने, बांधकाम उपकरणे, ट्रॅक्टर, वापरलेली वाहने आणि लघू उद्योगांसाठी कर्ज देते. कंपनी गोल्ड लोन फायनान्सिंग, हाउसिंग फायनान्स आणि सामान्य विमादेखील प्रदान करते. 16,097 कोटी रुपये मार्केट कॅप असलेली ही कंपनी संबंधित उद्योग क्षेत्रातील सर्वात आशादायक प्रवास नोंदविणा-या कंपन्यांपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT