Punjab National Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

Punjab National Bank: पीएनबी देतेय स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, लग्नासाठी बनवलेले दागिने मिळवा....!

PNB Sovereign Gold Bonds: तुमचाही स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Punjab National Bank: तुमचाही स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्र सरकार आणि पंजाब नॅशनल बँकेकडून तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.

तुमच्याकडे अजून 3 दिवस बाकी आहेत. म्हणजेच, तुम्हीही लग्नासाठी बनवलेले दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर यावेळी स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे. यावेळी तुम्हाला 5,926 रुपये प्रति ग्रॅमने सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. पीएनबीने अधिकृत ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

सोन्याचा भाव किती?

सरकारने (Government) सरकारी गोल्ड बाँड (SGB) योजना 2023-24 सुरु केली आहे, आता तुमच्याकडे 3 दिवस शिल्लक आहेत. यासाठी सोन्याचा भाव 5,926 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आला आहे. दुसरीकडे, जर तुम्ही ऑनलाइन सोने खरेदी केले तर तुम्हाला 5876 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने मिळेल.

दुसरीकडे, PNB ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय वैयक्तिक आणि HUF असलेले गुंतवणूकदार जास्तीत जास्त 4 किलो सोन्यात गुंतवणूक करु शकतात.

त्याचवेळी, ट्रस्टसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक (Investment) 20 किलो आहे. तुम्हाला 5876 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने मिळेल.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड कुठे खरेदी करु शकतो?

स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड) वगळता सर्व बँकांद्वारे सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात.

किती वर्षांनी मॅच्युरिटी

सॉवरेन गोल्ड बॉन्डची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे. परंतु पाच वर्षांनंतर, पुढील व्याज भरण्याच्या तारखेला, तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये, गुंतवणूकदाराने किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास, गुंतवणूकदार सॉवरेन गोल्ड बॉन्डवरही कर्ज घेऊ शकतो, परंतु गोल्ड बॉन्ड तारण ठेवावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT