PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 1, 2, 5, 10 अन् 20 रुपयांची नाणी करणार जारी

नवी दिल्ली येथे वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह समारंभाचे उद्घाटन करणार आहेत

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह-समारंभाचे उद्घाटन करताना 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची स्पेशल सीरीज प्रकाशीत करणार आहेत. विशेष म्हणजे ही स्पेशल सीरीजची नाणी दृष्टिहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येतील. (PM Narendra Modi Big Announcement)

PMO ने जारी केलेले निवेदन,

PM 6 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह समारंभाचे उद्घाटन करणार आहेत, PMO ने एका निवेदनात म्हटले आहे. "पंतप्रधान 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची स्पेशल सीरीज प्रकाशीत करणार आहेत," असे त्यात म्हटले आहे.

ही नाणी अशी असतील,

स्पेशल सीरीज अंतर्गत या नाण्यांवर AKAM चा लोगो असणार आहे. पीएमओच्या निवेदनात म्हटले की, "नाण्यांच्या या स्पेशल सीरीजमध्ये AKAM लोगोची थीम असेल आणि दृष्टिहीन व्यक्तींना ते सहजरित्या ओळखता येतील." हा आठवडा 6 ते 11 जून 2022 या कालावधीत 'आझादी का अमृत महोत्सव' (AKAM) चा भाग म्हणून साजरा करण्यात येत आहे.

नाण्यांच्या स्पेशल सीरीज व्यतिरिक्त, पंतप्रधान क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल - जन समर्थ पोर्टल, सरकारी क्रेडिट योजनांना जोडणारे एक-स्टॉप डिजिटल पोर्टल देखील लॉन्च करणार आहेत. जन समर्थ पोर्टल हे अशा प्रकारचे पहिले व्यासपीठ आहे जे लाभार्थ्यांना थेट कर्जदारांशी जोडून ठेवण्याचे काम करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT