PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Ration Card: पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना दिवाळी भेट, 80 कोटी रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची घोषणा

Ration Card: जर तुमच्याकडे रेशनकार्ड असेल आणि तुम्ही केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोफत रेशन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Ration Card: जर तुमच्याकडे रेशनकार्ड असेल आणि तुम्ही केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोफत रेशन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील रॅलीमध्ये मोफत रेशन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

पीएम मोदींनी रॅलीत सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार पुढील पाच वर्षांसाठी 80 कोटींहून अधिक गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजनेचा विस्तार करणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, सरकारच्या या पावलावर सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे.

सध्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) लाभार्थ्यांना 1-3 रुपये प्रति किलो दराने अन्नधान्य दिले जाते. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिले जाते. अंतोदय अन्न योजनतर्गंत (AAY) रेशनकार्डधारकांना दरमहा 35 किलो धान्य दिले जाते.

31 डिसेंबर 2023 रोजी PMGKAY ची टाइमलाइन पूर्ण होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) काळात 2020 मध्ये PMGKAY सुरु करण्यात आली. या अंतर्गत, सरकार NFSA कोट्यातील व्यक्तींना 5 किलो धान्य मोफत पुरवते. केंद्राने PMGKAY आणि NFSA योजनांचे विलीनीकरण केले आहे.

दुसरीकडे, सरकारी अधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे वर्णन 'देशातील वंचितांना नवीन वर्षाची भेट' असे केले आहे. NFSA अंतर्गत 81.35 कोटींहून अधिक लोकांना अन्नधान्य मिळेल, असे सांगण्यात आले.

ते म्हणाले की, लाभार्थ्यांना धान्यासाठी पैसे देण्याची गरज भासणार नाही. NFSA केंद्राने 2013 मध्ये सुरु केली होती. या अंतर्गत सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

अलीकडेच, केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी संसदेत सांगितले होते की, PMGKAY अंतर्गत, सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 1,118 लाख टन अन्नधान्य वाटप केले आहे.

त्याचबरोबर, सर्व टप्प्यांसाठी खाद्यान्न अनुदान आणि केंद्रीय सहाय्यासाठी एकूण मंजूर बजेट सुमारे 3.91 लाख कोटी रुपयांचे असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT