5G Launching
5G Launching Dainik Gomantak
अर्थविश्व

5G Launching: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशात 5G सेवा लॉन्च; जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

गोमन्तक डिजिटल टीम

5G Launching: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारतातील 13 शहरांत 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 2023 पर्यंत 5G सेवेचा संपूर्ण देशात विस्तार होणार आहे. दिल्लीत आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 5G सेवेचे लॉन्चिंग केले. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.

जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

1.बहुप्रतिक्षित इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 च्या 6 व्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 5G सेवेचा शुभारंभ केला. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान इंडिया मोबाइल काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे.

2.पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.

3.दिवाळीनंतर देशातील या 13 शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे.

4.प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा पुरवठादारांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉवरती 5G सेवेचे प्रयत्यक्ष अनुभव घेतला.

5.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिलायन्स जिओच्या स्टॉल्सपासून सुरुवात करत, 'True 5G' उपकरणे आणि Jio Glass प्रत्यक्ष अनुभव घेतला. पंतप्रधानांनी Airtel, Vodafone Idea, C-DOT यासह इतर स्टॉल्सना भेट दिली

6.दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव आणि रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे सुनील भारती मित्तल आणि व्होडाफोन आयडियाचे कुमार मंगलम बिर्ला यावेळी उपस्थित होते.

7.प्रदर्शनात ड्रोन-आधारित शेती, उच्च-सुरक्षा राउटर आणि एआय आधारित सायबर धोका शोध प्लॅटफॉर्म, स्वयंचलित मार्गदर्शित वाहने, अँबुपॉड - स्मार्ट रुग्णवाहिका, संवर्धित वास्तव / आभासी वास्तव/ शिक्षण आणि कौशल्य विकास, सांडपाणी निरीक्षण प्रणाली, स्मार्ट-कृषी कार्यक्रम, आरोग्य निदान, यांचे प्रात्यक्षिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले.

8.दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांनी संयुक्तपणे इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) आयोजित केली आहे. हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच असल्याचा दावा केला जात आहे.

9."5G सेवा नवीन आर्थिक संधी आणि सामाजिक फायदे मिळवून देऊ शकते, ज्यात भारतीय समाजासाठी परिवर्तनाची क्षमता आहे. देश विकासातील पारंपारिक अडथळे दूर करण्यास याचा फायदा होईल. स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उपक्रमांद्वारे नवकल्पनांना प्रोत्साहन मिळेल, तसेच 'डिजिटल'ला पुढे जाण्यास मदत करेल.

10.दूरसंचार स्पेक्ट्रमचा नुकताच लिलाव पार पडला यामध्ये, विक्रमी ₹ 1.5 लाख कोटी रूपयांची बोली लागली. मुकेश अंबानी यांच्या Jio ने ₹ 88,078 कोटींच्या बोलीसह जवळपास निम्म्या ठिकाणी वर्चेस्व मिळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT