Farmer  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: आयकर भरणाऱ्या 'या' शेतकऱ्यांची होणार अडचण, द्यावे लागतील पैसे

Income Tax Return: सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पावले उचलत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक उपक्रमही हाती घेतले आहेत.

दैनिक गोमन्तक

Income Tax Return: सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पावले उचलत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक उपक्रमही हाती घेतले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) देखील चालवली जात आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत दिली जाते. मात्र, आता काही शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते.

Income Tax

वास्तविक, लोकांनाही आयकर भरावा लागतो. जर लोकांचे उत्पन्न करपात्र असेल तर त्यावर कर भरला जातो. आयकर विभागाने कर भरण्यासाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅबही निश्चित केले आहेत. दुसरीकडे, जर शेतकरी (Farmer) कर भरत असतील आणि पीएम किसान सन्मान निधीचाही लाभ घेत असतील, तर अशा शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

पात्र शेतकऱ्यांना रक्कम

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन समान हप्ते दिले जातात. याअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम पात्र शेतकऱ्यांनाच दिली जाते. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात पाठवली जाते.

परत करावयाची रक्कम

तथापि, पात्र शेतकर्‍यांची निवड करताना असा नियम आहे की, जर शेतकर्‍याने आयकर भरला असेल तर तो पीएम किसान सन्मान निधीची रक्कम घेण्यास पात्र राहणार नाही. अशा परिस्थितीत पीएम किसानची रक्कम त्यांच्या खात्यात आली तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसानची रक्कम परत करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT