PM Kisan Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: अपात्र नागरिकांना केंद्र सरकारचा दणका

आता योजनांचा गैरवापर थांबणार

दैनिक गोमन्तक

PM Kisan Scheme: सरकारी योजनांचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांना लाभार्थ्यांच्या यादीतून काढून टाकण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. संबंधितांपासून 18000 कोटी रुपये वाचवण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. यापैकी अनेकांना लाभार्थ्यांच्या यादीतून आधीच काढून टाकण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या मदतीने केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी, मनरेगा आणि खत अनुदानाच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम सुरू केले आहे. पडताळणी दरम्यान अनेक बनावट लाभार्थी समोर आलेले आहेत, तसेच

एका वृत्तपत्राला दिलेल्या निवेदनात या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, या योजनांमधून बनावट लाभार्थ्यांना समोर आणून सरकार या आर्थिक वर्षात किमान 18,000 कोटी रुपयांची बचत करेल

अपात्र असूनही जे शेतकरी किसान सन्मान निधीचा लाभ घेत होते अशा 1.7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीतून वगळण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, गेले सहा महिने राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्ताने हे काम सुरु आहे. तसेच पीएम किसानच्या माध्यमातून या आर्थिक वर्षात सरकार 9000 कोटी रुपये वाचवेल अशी माहिती समोर आली आहे.

खत अनुदान

  • सवलतीच्या दरात सरकार शेतकऱ्यांना युरिया पुरवते.

  • सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 1.74 लाख कोटी रुपये ठेवले आहेत.

  • हेराफेरी रोखण्यासाठी येथे पथक तयार करण्यात आले आहे.

मनरेगा

  • मनरेगामध्ये सरकारने सुमारे 33 लाख लोकांना डेटाबेसमधून काढून टाकले आहे.

  • यातून सरकारचे सुमारे 4000 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे.

  • यंदाच्या अर्थसंकल्पात मनरेगासाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्के कमी आहे.

काय आहे पीएम किसान सन्मान निधी?

  • पीएम किसान सन्मान निधी ही सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे ज्यामध्ये त्यांना आर्थिक मदत दिली जाते.

  • शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते.

  • ही मदत दर 4 महिन्यांनी 2 रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते.

  • याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती

  • आतापर्यंत 2.40 लाख कोटी रुपये त्याअंतर्गत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.

  • सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 60,000 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT