PM Kisan 24th Installment Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

PM Kisan 24th Installment Update: ऐन सणासुदीच्या दिवसांत देशभरातील कोट्यवधी बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

PM Kisan 24th Installment Update: ऐन सणासुदीच्या दिवसांत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय असलेली 'पीएम किसान सन्मान निधी योजना' पुन्हा एकदा चर्चेत आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची भक्कम आर्थिक मदत दिली जाते.

ही रक्कम थेट शेतकर्‍यांच्या (Farmer) बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. जून महिन्यात 23वा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर आता पूर्ण चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच शेतकरी बांधवांचे डोळे पुढील हप्त्याच्या तारखेकडे लागले आहेत.

योजनेच्या नियमांनुसार दर चार महिन्यांनी एक हप्ता जारी केला जातो. या हिशोबाने पाहिल्यास पुढील हप्ता याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतांनुसार, यंदा 8 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पूर्वीच सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा करुन त्यांना दिवाळीची मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे.

मात्र, सरकारने अजूनही कोणत्याही अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर किंवा खोट्या दाव्यांवर शेतकर्‍यांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अनेकदा सरकारकडून निधी वितरित करुनही काही तांत्रिक चुकांमुळे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. जर तुम्ही योजनेचे आवश्यक नियम पूर्ण केले नसतील तर तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्वरित स्वतःचे स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे. नोंदणी करताना दिलेली सर्व माहिती अचूक आहे की नाही, हे सर्वात आधी तपासावे.

यासोबतच ई-केवाईसी पूर्ण असणे, शेतजमिनीच्या नोंदीचे डिजिटल पडताळणी म्हणजेच लँड सीडिंग पूर्ण असणे आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे. यापैकी एकही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास हप्त्याचे पैसे रोखले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी वेळीच ही कामे अधिकृत पोर्टलवरुन पूर्ण करुन घ्यावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT