PM Kisan 24th Installment Date: कधी रिलीज होणार पीएम-किसानचा 24वा हप्ता? त्याआधी उरका 'ही' 3 महत्त्वाची कामे, अन्यथा...

PM Kisan 24th Installment Date: देशभरातील इन्कम टॅक्स भरत नसलेल्या आणि पात्र शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक आधार ठरली.
PM Kisan 24th Installment Date
PM Kisan 24th Installment DateDainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan 24th Installment Date: देशभरातील इन्कम टॅक्स भरत नसलेल्या आणि पात्र शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना एक अत्यंत महत्त्वाची आर्थिक आधार ठरली. या योजनेअंतर्गत 23व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर, आता सर्व अन्नदात्यांचे डोळे 24व्या हप्त्याकडे लागले आहेत. जर तुम्हीही तुमच्या बँक खात्यात पुढील 2000 रुपयांचा हप्ता कधी येणार याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चला तर मग 24व्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत खात्यात येऊ शकतात, या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो आणि तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे त्वरित करुन घेतली पाहिजेत, याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

24वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून रोजी पश्चिम बंगालच्या तारकेश्वर येथून 23वा हप्ता देशातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला होता, ज्यामध्ये 18,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाटप करण्यात आली होती. पीएम किसान (PM Kisan) योजनेचे नियम पाहता, ही आर्थिक मदत दर 4 महिन्यांच्या अंतराने दिली जाते. त्यानुसार, जून महिन्यानंतरचा हप्ता येत्या ऑक्टोबर 2026 मध्ये जारी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

PM Kisan 24th Installment Date
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो सावधान! 'या' 3 कारणांमुळे अडकू शकतो 2,000 रुपयांचा हप्ता

शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळते?

या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना सरकारकडून दरवर्षी एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षभरात प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट आधार-लिंक्ड बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे जमा केली जाते. 2019 मध्ये सुरु झालेल्या या योजनेतून आतापर्यंत सरकारने 4.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये वितरित केला.

PM Kisan 24th Installment Date
PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

तातडीने करा ही 3 महत्त्वाची कामे

सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना रोखण्यासाठी नियमांमध्ये काही कडक बदल केले आहेत. जर तुम्हाला 24व्या हप्त्याचा लाभ विनाअडथळा मिळवायचा असेल, तर खालील तीन गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या:

ई-केवायसी (e-KYC): सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही ओटीपी किंवा बायोमेट्रिक आधारावर हे पूर्ण करु शकता.

आधार सीडिंग (Aadhaar Linking): तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeded) असणे आणि त्यात डीबीटी (DBT) सेवा सुरु असणे अनिवार्य आहे.

लँड सीडिंग (Land Seeding): पीएम-किसान पोर्टलवर तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांची आणि नोंदींची पडताळणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

PM Kisan 24th Installment Date
PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

तसेच, 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेल्या प्रकरणांमध्ये किंवा एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांनी लाभ घेतल्यास सरकारकडून पडताळणी पूर्ण होईपर्यंत हप्ता रोखला जाऊ शकतो.

PM Kisan 24th Installment Date
PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

असे चेक करा हप्त्याचे स्टेटस

जर तुम्हाला तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासायचे असेल, तर तुम्ही घरबसल्या खालील सोप्या पायऱ्या फॉलो करु शकता:

सर्वप्रथम पीएम-किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच pmkisan.gov.in या वेबपोर्टलवर जा.

होमपेजवर उजव्या बाजूला दिलेल्या 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर आपला नोंदणी क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करुन सबमिट करा.

आता तुमच्या स्क्रीनवर तुमच्या ई-केवायसी, लँड सीडिंग आणि बँक आधार लिंकिंगचा सविस्तर स्टेटस पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com