PM Kisan Samman Nidhi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Installment: 19 दिवस उलटूनही पीएम किसानचा 13वा हप्ता आला नाही? अन्नदात्याकडे 'हा' आहे पर्याय

Pm Kisan Installment News: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Pm Kisan Installment News: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. सुमारे 16 हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

परंतु असे अनेक शेतकरी आहेत, जी ही रक्कम मिळवण्यास पात्र आहेत. परंतु त्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झालेले नाहीत. ही रक्कम अजूनही या शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकते. आम्ही तुम्हाला त्या पर्यायांची माहिती देत ​​आहोत.

सन्मान निधीचे पैसे आले नाहीत तर...?

अनेक वेळा पीएम किसानसाठी अर्ज करताना आधार क्रमांक, बँक (Bank) खात्याची अचूक माहिती न दिल्याने पैसे रोखले जातात. तुम्ही pmkisan.gov.in वर भेट देऊन तुम्ही दिलेला तपशील बरोबर आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.

काही गडबड असेल तर दुरुस्त करा. ही रक्कम शेतकऱ्यांना (Farmers) पुढील हप्त्यादरम्यान मिळू शकते. आता तुम्ही ही माहिती कशी दुरुस्त करु शकता ते जाणून घ्या. तसेच ई-केवायसीची प्रक्रियाही पूर्ण करा.

ही प्रक्रिया आहे

सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर बेनिफिशियरी स्टेटसचे बटण दाबा.

यानंतर तुम्हाला खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल.

आधार क्रमांक प्रविष्ट करा.

या प्रक्रियेनंतर, सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.

खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक चुकीचा असल्यास तो दुरुस्त करता येतो.

कुठे संपर्क करावा

तुम्ही लाभार्थी यादीत असाल आणि तरीही तुमच्या खात्यात 13 वा हप्ता आला नसेल, तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता. याशिवाय 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल. येथे तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT