Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 14 व्या हप्त्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा; आली ही अपडेट!

PM Kisan Scheme Update: केंद्र सरकारने अलीकडेच पंतप्रधान किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत.

Manish Jadhav

PM Kisan Samman Nidhi 14th Installment: केंद्र सरकारने अलीकडेच पंतप्रधान किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचे पैसे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. तुम्हीही पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

दरम्यान, 13व्या हप्त्यानंतर लवकरच, 14व्या हप्त्याचे पैसे (PM Kisan 14th Installment Date) करोडो शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत. 14 व्या हप्त्यासाठी सरकारने आधीच तयारी सुरु केली आहे. 14 व्या हप्त्याबाबत सरकारने (Government) बरीच माहिती दिली आहे, ज्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

16,000 कोटी जारी करण्यात आले

सरकारने 27 फेब्रुवारी रोजी 13 वा हप्ता जारी केला होता. या हप्त्यांतर्गत 16000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, ज्याचा देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना (Farmer) फायदा झाला आहे.

14 वा हप्ता मिळविण्यासाठी हे काम करा

सध्या, तुम्हाला पीएम किसानच्या 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागेल, परंतु तुम्ही अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ती त्वरित पूर्ण करा.

ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाणार नाहीत, असे सरकारने सांगितले आहे. जर तुम्ही हे काम वेळेत केले नाही तर 13व्या प्रमाणेच तुमचा 14वा हप्ताही अडकू शकतो.

ई-केवायसी कसे केले जाऊ शकते?

>> पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

>> वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमचा आधार क्रमांक टाका.

>> यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.

>> यानंतर 'Submit' वर क्लिक करा.

>> आता तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

पीएम किसानशी संबंधित येथे तक्रार करा

जर 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात अद्याप आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT