PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने आजपासून सुरु केली मोठी मोहीम; घरपोच मिळणार 'ही' सुविधा

PM Kisan: देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Manish Jadhav

PM Kisan Samman Nidhi: देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

योगी सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा 100 टक्के लाभ देण्यासाठी 22 मे पासून मोठी मोहीम सुरु केली आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील संपृक्तता अभियान 22 मे ते 10 जून पर्यंत सुरु राहणार आहे. याआधी शासनाच्या प्रतिनिधींनी घरोघरी जाऊन अशा शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे, जे विविध कारणांमुळे वंचित राहिले आहेत.

केंद्राच्या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळेल

सध्या यूपीमधील 2.83 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) निधीचा लाभ मिळत आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मोहीम राबवून देण्यात यावा.

या मोहिमेवर थेट मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांचे लक्ष आहे. आत्तापर्यंत पीएम किसान निधीचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत.

ही मोहीम 22 मे ते 10 जून या कालावधीत चालणार आहे

आता 22 मे पासून जुन्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची प्रकरणे आणि नवीन शेतकऱ्यांची प्रकरणे या योजनेशी जोडण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम 10 जूनपर्यंत चालणार आहे. या मोहिमेतर्गंत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शेतकरी लाभार्थी संपृक्तता मोहीम राबवण्यात येणार आहे.

ही मोहीम सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातून पाच दिवस चालणार आहे. मोहिमेतर्गंत महसूल विभाग, ग्रामविकास आणि पंचायत राज विभागासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.

शेतकऱ्यांच्या संदर्भात महत्वाची बैठक

ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरात ग्रामप्रधान, ग्रामविकास अधिकारी, पंचायत सचिव आणि लेखपाल आदी उपस्थित राहणार आहेत.

या योजनेत आतापर्यंत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांबाबत (Farmer) मुख्य सचिवांनी गेल्या काही दिवसांत महत्त्वाची बैठक घेतली होती. यामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ओपन सोर्समधून अर्ज केले नाहीत, त्यांची संख्या मोठी आहे.

तसेच, ग्रामपंचायत स्तरावर सुरु असलेल्या घरोघरी सर्वेक्षण आणि प्रचार मोहिमेचाही आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे. यादरम्यान विविध विभागांचे अधिकारी ग्रामपंचायतींना भेट देऊन शिबिराची पाहणी करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT