PM Kisan Scheme Latest News: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ घेतलेल्या करोडो शेतकऱ्यांसाठी एक मोठे अपडेट आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्त्यांचे पैसे जमा केले आहेत. जर अद्याप तुमच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर झाले नाहीत, तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.
30 नोव्हेंबरपर्यंत खात्यात पैसे येतील
सरकारने नुकतेच 12 व्या हप्त्याचे पैसे कोट्यवधी शेतकर्यांच्या (Farmer) खात्यात ट्रान्सफर केले आहेत, परंतु अद्याप लाखो शेतकर्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे सरकारने (Government) 30 नोव्हेंबरपर्यंत हे पैसे ट्रान्सफर केले जातील असे सांगितले आहे.
तुम्ही कृषी मंत्रालयाकडे तक्रार करु शकता
ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत, ते सर्व शेतकरी कृषी मंत्रालयाकडे तक्रार करु शकतात, असे सरकारने सांगितले आहे. 30 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे येतील. याशिवाय, तुम्ही तुमच्या लेखपाल आणि कृषी अधिकारी यांच्याकडेही तक्रार करु शकता.
या क्रमांकांवर संपर्क साधू शकता
शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 155261/011-24300606 वर कॉल करु शकतात. येथे तुम्हाला तुमच्या हप्त्याचे अपडेट मिळेल. यासोबतच तुम्ही पंतप्रधान किसान योजनेच्या 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर किंवा थेट हेल्पलाइन क्रमांक 011-23381092 वर संपर्क साधू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.