Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज, 'या' दिवशी खात्यात येणार पीएम किसानचा 14वा हप्ता!

PM Kisan Nidhi Latest News: देशातील 12 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Manish Jadhav

PM Kisan Nidhi Latest News: देशातील 12 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

यापूर्वी, 13 वा हप्ता सरकारने 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला होता. त्यावेळी 8.42 कोटी शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याची रक्कम देण्यात आली होती.

हप्ता आल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी, 14 व्या हप्त्याबाबत एक मोठे अपडेट येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 14वा हप्ता म्हणून 2 हजार रुपये आणि वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात.

14 वा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे

वेळापत्रकानुसार, पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान रिलीज होणार आहे.

मागील वर्षी, याच कालावधीत मिळालेला 11 वा हप्ता 31 मे 2022 ला हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र यावेळी खात्यात 14 वा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे.

या वेळी 15 मेच्या सुमारास सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर हप्त्याची रक्कम पाठवणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

आर्थिक मदत करेल

वास्तविक, यावेळी हप्त्याचे पैसे लवकर येणे अपेक्षित असल्याने अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत पैसे वेळेवर आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, याबाबत सरकारकडून (Government) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नोंदणी कशी करावी

जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला नोंदणी करायची असेल, तर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील लेखपाल किंवा पीएम किसान योजनेसाठी निवडलेल्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधावा लागेल. येथे संबंधित फॉर्म भरुन तुमची कागदपत्रे सबमिट करा. तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राशी (CSC) देखील संपर्क साधू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT