PM Kisan Scheme  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 13व्या हप्त्याबाबत सरकारने दिली मोठी अपडेट!

PM Kisan Samman Nidhi Scheme: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Yojana) लाभ घेणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Scheme: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Yojana) लाभ घेणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही पीएम किसानच्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने 13 व्या हप्त्याबाबत आवश्यक अपडेट जारी केले आहेत. पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता डिसेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत ट्रान्सफर केला जाईल. 17 ऑक्टोबर रोजी सरकारने 12 व्या हप्त्याचे पैसे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत.

दरम्यान, पीएम किसान (PM Kisan) योजनेबाबत अनेक प्रकारची फसवणूक पाहायला मिळत आहे, त्यामुळे सरकारने आतापासून या योजनेसाठी राशनकार्ड क्रमांक सादर करणे आवश्यक केले आहे. जर तुम्ही तुमचा राशनकार्ड (Ration Card) नंबर दिला नसेल तर तुम्हाला 2000 रुपये मिळणार नाहीत.

यासोबतच, सरकारने ई-केवायसी, भूमी अभिलेख पडताळणी आणि आता राशनकार्ड क्रमांक सादर करणे बंधनकारक केले आहे, जरी शेतकऱ्याला त्याचे राशनकार्ड सादर करावे लागणार नसले तरी त्याची नवीन नोंदणी करुन घ्यावी लागेल.

दुसरीकडे, जर कोणी शेतजमिनीचा मालक असेल, पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्त झाला असेल, विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल, तर असे लोकही शेतकरी योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतात. व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीयही अपात्रांच्या यादीत येतात. आयकर भरणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

तसेच, या योजनेत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून लवकरच 13 व्या हप्त्याचे पैसेही खात्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

SCROLL FOR NEXT