Sugarcane Price Hike in Punjab: एकीकडे केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याची देशभरातील शेतकरी वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे, पंजाब सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने केलेल्या घोषणेचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उसाच्या समर्थन मूल्यात 360 रुपयांवरुन 380 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे.
खासगी साखर कारखान्यांची थकबाकी लवकरच दिली जाईल
भगवंत मान यांनी शेतकर्यांना उसाच्या एसएपी (SAP) अंतर्गत गतवर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल 20 रुपये जादा मिळणार असल्याची घोषणा केली. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांची (Farmer) सहकारी सूतगिरण्यांवरील थकबाकी होती, त्यांनाही मोकळे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच खासगी साखर कारखान्यांची थकबाकीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे. राज्य विधानसभेच्या संक्षिप्त अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी त्यांनी उसाच्या राज्य कृषी भावात (एसएपी) वाढीची घोषणा केली.
200 कोटी रुपये अतिरिक्त खर्च
यापूर्वी, ऑगस्ट 2021 मध्ये तत्कालीन काँग्रेस (Congress) सरकारने उसाच्या एसएपीमध्ये प्रति क्विंटल 50 रुपयांची वाढ केली होती. यानंतर उसाचा भाव 360 रुपये प्रतिक्विंटल झाला होता. उसाच्या एसएपी अंतर्गत शेतकऱ्यांना गतवर्षीपेक्षा 20 रुपये प्रतिक्विंटल अधिक भाव मिळणार असल्याचे मान यांनी सांगितले. या निर्णयानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांना फायद्यासाठी दरवर्षी 200 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार आहे.
साखर कारखान्यांची गाळप क्षमता 2.50 लाख हेक्टर
मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले की, 'राज्यातील शेतकर्यांनी पीक विविधीकरणांतर्गत ऊस पिकाचा अवलंब करावा. सध्या पंजाबमध्ये (Punjab) केवळ 1.25 लाख हेक्टरवर उसाची लागवड केली जाते, तर साखर कारखान्यांची गाळप क्षमता 2.50 लाख हेक्टर आहे. त्यामुळेच उसाच्या एसएपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
तसेच, सरकारच्या या पावलामुळे आगामी काळात उसाचे उत्पादन वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सहकारी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची थकीत रक्कम यापूर्वीच भरली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र दोन खासगी साखर कारखान्यांनी अद्याप थकबाकी भरलेली नाही. लवकरच खासगी साखर कारखानदारही पैसे देतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.