PM Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: 14 व्या हप्त्याआधी PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, खात्यात येणार एवढे लाख; असा करा अर्ज

PM Kisan FPO Yojana 2023: तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

PM Kisan FPO Yojana 2023: तुम्ही पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पीएम किसान निधीच्या 14 व्या हप्त्याची तयारी सरकारी विभागांकडून सुरु आहे.

एप्रिल ते जुलै दरम्यान या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

यासाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांना नवीन शेती (Agriculture) व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपये दिले जात आहेत.

शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मोदी सरकारने 'पीएम किसान एफपीओ योजना' योजना सुरु केली आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जातील. देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकर्‍यांना मिळून एक ऑर्गनाइजेशन स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) शेतीची साधने किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे.

अर्ज याप्रमाणे करावा लागेल

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

होम पेजवर दिलेल्या FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

येथे 'Registration' या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक फॉर्म दिसेल.

फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा.

यानंतर, पासबुक किंवा रद्द केलेला चेक किंवा आयडी स्कॅन करुन अपलोड करा.

शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा.

लॉगिन कसे करायचे

राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर, तुम्ही होम पेजवर दिलेल्या FPO पर्यायावर क्लिक करा.

आता login च्या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.

त्यात युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.

यासह तुम्ही लॉगिन कराल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT