Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: बाराव्या हप्त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत? नाराज होऊ नका, आली मोठी अपडेट

PM Kisan 12th Installment Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 12 वा हप्ता जारी केला आहे. त्यामुळे 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागले आहेत. पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे यावेळी सुमारे 2.62 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीत. मात्र, या शेतकऱ्यांनी निराश होण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 12वा हप्ता अद्याप मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात 30 नोव्हेंबरपर्यंत पैसे जमा केले जातील.

दरम्यान, केंद्र सरकारची (Central Government) सर्वात महत्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2022 अंतर्गत पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही तात्काळ केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करु शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया...

तक्रार कुठे आणि कशी करायची?

  • जर तुमच्या खात्यात 2000 रुपये आले नसतील तर तुम्ही प्रथम तुमच्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

  • जर हे लोक तुमचे ऐकत नसतील किंवा त्यानंतरही खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही संबंधित हेल्पलाइनवर कॉल करु शकता.

  • हा डेस्क (PM-KISAN Help Desk) सोमवार ते शुक्रवार चालू असतो.

  • याशिवाय pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही संपर्क साधू शकता.

  • तरीही काम करत नसल्यास 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) या क्रमांकावर कॉल करा.

कृषी मंत्रालयाकडे तक्रार करा

कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याच्या (Farmers) बँक खात्यात पोहोचत नसतील, तर त्याचे त्वरित निराकरण केले जाईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नसतील किंवा काही तांत्रिक अडचण असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त केली जाईल.

तुम्ही संपर्क करु शकता

घरबसल्या तुम्ही या योजनेचे स्टेटस सहज तपासू शकता आणि अर्जही करु शकता. तुम्ही या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. त्याचा दिल्लीतील (Delhi) फोन नंबर 011-23382401 आहे, तर ई-मेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे.

मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे (कृषी मंत्रालय हेल्पलाइन क्रमांक)

पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT