PM Kisan Scheme  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: 13 व्या हप्त्यापूर्वी PM मोदींची शेतकऱ्यांना भेट, खात्यात येणार 15 लाख

PM Kisan FPO Yojana 2022: तुम्हीही किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan FPO Yojana 2022: तुम्हीही किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. किंबहुना केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे कर्ज फेडण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. या क्रमाने, नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते समजून घ्या...

शेतकऱ्यांना 15 लाख मिळणार

शेतकऱ्यांच्या (Farmer) आर्थिक मदतीसाठी सरकारने 'पीएम किसान एफपीओ योजना' योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत फॉर्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला 15 लाख रुपये दिले जातील. नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे.

याप्रमाणे अर्ज करा

  • सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

  • आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

  • आता 'Registration' या पर्यायावर क्लिक करा.

  • आता तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उघडेल.

  • आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.

  • यानंतर, पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करुन अपलोड करा.

  • आता सबमिट पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे लॉग इन करा

  • तुम्हाला लॉग इन करायचे असल्यास, प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

  • यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

  • आता लॉगिन पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.

  • आता त्यात युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.

  • यासह तुम्ही लोक लॉग इन कराल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT