PM Kisan Samman Nidhi 19th installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता केंद्र सरकारकडून फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस पात्र लाभार्थ्यांना खात्यात पाठवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित केला जाईल. पंतप्रधान 24 फेब्रुवारी रोजी कृषी कार्यक्रमांनिमित्त बिहार दौऱ्यावर असणार आहेत. त्याचदिवशी, पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता पाठवतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या 18व्या हप्त्याचे पैसे पाठवले होते.
पीएम किसान ही एक केंद्रीय योजना आहे, ज्याला भारत सरकारकडून 100 टक्के निधी मिळतो. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. या योजनेअंतर्गत, दरवर्षी 6,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांचे थेट पेमेंट हस्तांतरित केले जाते. याचा अर्थ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित केले जातात. या योजनेसाठी शेतकऱ्यांचे (Farmer) eKYC असणे खूप महत्वाचे आहे.
शेतकरी या तीन पर्यायांपैकी कोणताही एक निवडून त्यांचे ईकेवायसी करु शकतात: ओटीपी आधारित ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध), बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी (कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि स्टेट सर्व्हिस सेंटर (एसएसके) वर उपलब्ध), फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी (लाखो शेतकरी वापरतात अशा पीएम किसान मोबाइल अॅपवर उपलब्ध).
पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड, नागरिकत्वाचा पुरावा, त्यांच्या मालकीची जमीन सिद्ध करणारी कागदपत्रे, त्यांच्या बँक खात्याची माहिती आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री-किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री-किसान पोर्टलला भेट द्यावी आणि ऑनलाइन नोंदणी करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.