Money Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खात्यात येणार एवढी मोठी रक्कम!

Krishi Ashirvaad Yojana: केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे.

Manish Jadhav

Krishi Ashirvaad Yojana: केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे.

तुम्हीही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि झारखंड राज्यातील रहिवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पीएम किसान निधी योजना केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. त्याचप्रमाणे, झारखंड सरकारकडून कृषी आशीर्वाद योजना राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना 5000 रुपयांची मदत मिळते.

कृषी आशीर्वाद योजना

कृषी आशीर्वाद योजना ही झारखंड (Jharkhand) सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे, ज्यामध्ये 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर 5000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

खरीप हंगामाच्या लागवडीपूर्वी ही मदत दिली जाते. 5 एकर जमीन असलेले शेतकरी जास्तीत जास्त 25,000 रुपये अनुदान घेऊ शकतात.

राज्यातील पीएम किसान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 11,000 रुपये आणि कमाल 31,000 रुपयांचा लाभ मिळेल.

त्याचबरोबर, एखाद्या शेतकऱ्याकडे एक एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असल्यास, खरीप हंगामाच्या काढणीपूर्वी सरकारकडून 5000 रुपये अनुदान दिले जाईल.

पीएम किसान (PM Kisan) अंतर्गत त्यांना आधीच वार्षिक 6000 रुपयांचा लाभ मिळत आहे. अशा प्रकारे, वर्षभरात एकूण 11,000 रु. तसेच 5 एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्याला 25,000 रुपये म्हणजे एकूण 31,000 रुपये मिळतील.

योजनेच्या अटी आणि शर्ती

- झारखंडमधील 22 लाख 47 हजार शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.

कृषी आशीर्वाद योजनेचा लाभ घेण्यासाठी झारखंडमधील फक्त लहान आणि अत्यल्प शेतकरीच अर्ज करु शकतात.

- 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.

याप्रमाणे स्टेटस तपासा

झारखंडमध्ये काही काळापूर्वी 'मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजने'साठी अर्ज मागवण्यात आले होते. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही http://mmkay.jharkhand.gov.in/ वर जाऊन अर्जाची स्थिती तपासू शकता. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजना अॅप देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT