Farmer  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकार लवकरच पाठवणार 15व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Benefit: मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. या योजनांतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदेही देते.

Manish Jadhav

PM Kisan Benefit: मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. या योजनांतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदेही देते. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी ही योजना देखील आहे.

या योजनेद्वारे शासनाकडून शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. आणि आता शेतकरी या योजनेअंतर्गत 15 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

पीएम किसान योजना

दरम्यान, नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 15 वा हप्ता जारी करेल अशी शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून (Government) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारने 27 जुलै 2023 रोजी योजनेचा 14 वा हप्ता जारी केला होता. पीएम-किसान योजनेंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो, जो प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देय आहे.

शेतकरी योजना

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी काही विशेष पात्रता असणे देखील खूप महत्वाचे आहे. याअंतर्गत शासनाने पात्रता निकषही निश्चित केले आहेत. अशा परिस्थितीत केवळ पात्र शेतकरीच पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात. चला तर त्याबद्दल जाणून घेऊया...

पात्रता निकष

-ही योजना खास गरीब शेतकऱ्यांसाठी (Farmers) आहे.

- सरकारी नोकरी किंवा आयकर भरणारे लोक या योजनेअंतर्गत अपात्र आहेत.

- कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

- EPFO ​​किंवा तत्सम संस्थांचे सदस्य पात्र नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

SCROLL FOR NEXT