PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, 28 जुलैला खात्यात येणार 14वा हप्ता?

PM Kisan 14th Installment: तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल.

Manish Jadhav

PM Kisan 14th Installment: तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नसल्याने लोक वाट पाहत आहेत.

14 व्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात येणे आवश्यक आहे. मात्र जुलै महिना संपत आला असताना करोडो शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. एका सरकारी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, यावेळी 28 जुलै रोजी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील.

9 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार

सरकारने (Government) दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचे पैसे 14व्या हप्त्याच्या रुपात दिले जाणार आहेत. पीएम मोदी 28 जुलै रोजी हप्ता थेट डायरेक्‍ट बेन‍िफ‍िट ट्रान्सफर (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत. यापूर्वी 27 फेब्रुवारी 2023 रोजी पीएम किसानचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला होता.

वार्षिक 6000 रुपये आर्थिक सहाय्य

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येक आर्थिक वर्षात पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत पाठवला जातो.

यापूर्वी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan Samman Yojana) लाभार्थींची स्टेटस पाहण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. पीएम किसानचे मोबाईल अॅप्लिकेशनही सरकारने सुरु केले आहे.

आता बेनिफिशियरी स्टेटस पाहण्याची पद्धतही बदलली आहे. तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस पाहायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक आवश्यक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

SCROLL FOR NEXT