PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 14 वा हप्ता? तारखेसंबंधी मोठा खुलासा

PM Kisan Latest Update: पीएम किसानचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे, आता देशातील कोट्यवधी शेतकरी त्याच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Manish Jadhav

PM Kisan 14th Installment Date: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) ही केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरकार दर चार महिन्यांनी 2000 रुपये देते. हा पैसा डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जातो. पीएम किसानचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे, आता देशातील कोट्यवधी शेतकरी त्याच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात. नवीन आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता सरकार लवकरच जारी करणार आहे.

साधारणपणे, आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा ऑगस्ट आणि नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो. जर एखाद्या शेतकऱ्याचे (Farmer) खाते DBT किंवा NPCI शी लिंक केलेले नसेल तर ते लवकरात लवकर करुन घ्या.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकतात

पीएम किसानचा 14वा हप्ता सरकार जारी होण्याची वाट पाहत आहे. यावेळी 14 वा हप्ता एप्रिल 2023 ते जुलै 2023 दरम्यान जारी केला जाणार आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जाहीर होण्याची शक्यता असल्याचा दावा कृषी मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी केला आहे.

यापूर्वी, 13 वा हप्ता देखील 26 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला होता. पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांची यादी कशी तपासायची

सर्वप्रथम पीएम किसानच्या पोर्टलवर जा.

येथे 'फॉर्मर कार्नर' खाली 'बेन‍िफ‍िश‍ियरी ल‍िस्‍ट' वर क्लिक करा.

आता राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक, गाव निवडा.

अहवाल मिळवण्यासाठी टॅबवर क्लिक करा.

eKYC ऑनलाइन कसे अपडेट करावे

पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

येथे उजवीकडे दिलेल्या EKYC पर्यायावर क्लिक करा.

येथे आधार कार्ड (Aadhar Card) क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा, आता शोध वर क्लिक करा.

आता आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.

OTP साठी क्लिक करा आणि दिलेल्या जागेत OTP टाका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

SCROLL FOR NEXT