PM Kisan Samman Nidhi Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: मोठी बातमी! कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी सरकारने जारी केला 'हा' आदेश

PM Kisan Samman Nidhi Scheme: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Scheme 13th Installment Date 2023: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हालाही 13व्या हप्त्यासाठी 2000 रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी सरकारने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यातच केंद्र सरकार हे पैसे शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात वर्ग करु शकते. यासोबतच कृषी मंत्रालयाने ट्विट करुन सांगितले आहे की, 28 जानेवारी 2023 ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची तारीख आहे.

कृषी मंत्रालयाने ट्विट केले

कृषी मंत्रालयाने ट्विट करत म्हटले की, लाभार्थ्यांनी 28 जानेवारी 2023 पर्यंत ई-केवायसी पडताळणी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांची पडताळणी झाली नाही त्यांना याचा लाभ मिळणार नाही. 13 व्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

अजूनही लाखो शेतकऱ्यांची पडताळणी झालेली नाही

बिहार (Bihar) सरकारच्या कृषी विभागाने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, शेतकऱ्यांना सूचित केले जाते की, पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

बिहार सरकारने सांगितले की, अजूनही 16.74 लाख लाभार्थींची पडताळणी झालेली नाही. हे काम होण्यासाठी डीबीटी कृषी विभागाकडून लाभार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात आला आहे.

पैसे कधी येऊ शकतात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार आज म्हणजेच 23 जानेवारी किंवा 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकते. सध्या तरी सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासा-

>> हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

>> आता Farmers Corner वर क्लिक करा.

>> आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

>> येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

पीएम किसानशी संबंधित येथे तक्रार करा

तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

SCROLL FOR NEXT