PhonePe started processing fee on Online recharge  Dainik Gomantak
अर्थविश्व

PhonePe वापरणं होणार महाग,यासाठी लागणार तुम्हाला चार्ज

PhonePe हे पहिले डिजिटल पेमेंट अॅप आहे जे UPI आधारित व्यवहारांसाठी शुल्क आकारणार आहे.

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही PhonePe वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुम्ही PhonePe ने तुमचा मोबाईल रिचार्ज करत असाल तर आता तुमच्या या ट्रॅन्जेक्शनवर वॉलमार्ट ग्रुपच्या डिजिटल पेमेंट कंपनीने प्रोसेसिंग फी आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी मोबाईल रिचार्ज करताना तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल आणि ते 1 ते 2 रुपयांदरम्यान असणार आहे . PhonePe ने सांगितले की, UPI द्वारे 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या मोबाइल रिचार्जसाठी, प्रत्येक व्यवहारासाठी 1 ते 2 रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे. (PhonePe started processing fee on Online recharge)

फोनपे हे पहिले डिजिटल पेमेंट अॅप आहे जे UPI आधारित व्यवहारांसाठी शुल्क आकारणार आहे. तर इतर कंपन्यांप्रमाणे, PhonePe देखील क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटसाठी प्रक्रिया शुल्क आकारत आहे. “आम्ही प्रत्येक छोट्या स्तरावर रिचार्जचे प्रयोग करत आहोत. या अंतर्गत काही वापरकर्ते मोबाईल रिचार्जसाठी पैसे देत आहेत. 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही, तर 50 ते 100 रुपयांचे रिचार्ज 1 रुपये आकारणार आहोत आणि 100 रुपयांच्या वरचे रिचार्ज रु .2 रुपये."

थर्ड पार्टी म्हणून, अॅपमध्ये UPI व्यवहारांच्या बाबतीत फोनपेचा सर्वात मोठा वाटा आहे. कंपनीने सप्टेंबरमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटीहून अधिक UPI व्यवहारांची नोंदणी केली होती. अॅप विभागातील त्याचा बाजारातील हिस्सा सुमारे 40 टक्के इतका आहे.

कंपनीच्या प्रवक्त्याने बिल पेमेंटवर बोलताना सांगितलं की फी आकारणारे आम्ही पहिलेच नाहीत . अगोदरपासूनच सर्व डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म बिल पेमेंटसाठी शुल्क आकारत आहेत. आता ती प्रमाणित प्रथा बनली आहे. जर क्रेडिट कार्डच्या मदतीने बिल भरले असेल तर आम्ही त्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारतो. इतर प्लॅटफॉर्मवर, ते सुविधा शुल्क म्हणून आकारले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT