कंपनी आता ओडिसाच्या (Odisha) गोपालपूर बंदरात फ्लोटिंग सी टर्मिनल (terminal) बांधण्याची योजना आखत आहे.  Dainik Gomantak
अर्थविश्व

Petronet कंपनी आता पेट्रोकेमिकल व्यवसायात पाऊल ठेवणार,ओडिसात उभारणार टर्मिनल

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, गेल इंडिया आणि ओएनजीसी यांची मिळून पेट्रोनेट (Petronet) एलएनजीमध्ये 50 टक्के हिस्सेदारी आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: देशातील लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) ची सर्वात मोठी आयात करणारी पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड (Petronet LNG Ltd.) गुजरातमध्ये (Gujarat) दहेज पेट्रोकेमिकल फॅक्टरी (petrochemical factory) उभारण्याचा विचार करीत आहे. गॅस (Gas) व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी कंपनी मोठ्या नफ्याच्या पेट्रोकेमिकल्स व्यवसायात प्रवेश करण्याच्या दृष्टीने उरतण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना पेट्रोलियम सचिव तरुण कपूर (Tarun Kapoor) म्हणाले, केरळमधील दहेज आणि कोची येथे नैसर्गिक वायू आयात करण्यासाठी पेट्रोनेटचे टर्मिनल आहेत. यासह, कंपनी आता ओडिसाच्या (Odisha) गोपालपूर बंदरात फ्लोटिंग सी टर्मिनल (terminal) बांधण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालात कपूर यांनी म्हटले आहे की, कंपनीला आपल्या अधिक व्यापक करुन त्यात विविधता आणायची आहे. कंपनी दहेज टर्मिनलवर इथेन/प्रोपेन आयात सुविधा विकसित करण्याची शक्यता आहे.

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना

पेट्रोनेट दहेज टर्मिनलवर आयात करण्यात येणाऱ्या प्रोपेनवर आधारित पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याची योजना आम्ही आखत आहोत. तथापि, त्यांनी प्रस्तावित पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सबद्दल अधिक तपशील दिला नाही. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू पेट्रोकेमिकल्समध्ये वापरले जातात. प्लास्टिक, पॅकेजिंग साहित्य आदीचे उत्पादन करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरले जाते.

सार्वजनिक उपक्रमांचा एकूण 50% हिस्सा

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, गेल इंडिया आणि ओएनजीसी यांची मिळून पेट्रोनेट एलएनजीमध्ये 50 टक्के हिस्सेदारी आहे. चार कंपन्या पेट्रोनेट बोर्डावर आहेत, त्यांचे नेतृत्व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव यांच्याकडे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: ..बोटी समुद्रात उतरणार! गोव्यात मासेमारी मोसमाला सुरवात; पारंपरिक मच्छीमारांची लगबग सुरु

Goa Rain: धारबांदोडा, सांगे, वाळपई केंद्रावर पावसाचे शतक! राज्यात जुलै महिन्यात 46 इंच पावसाची नोंद

Digital Arrest: TRAI, CBI अधिकारी असल्याचे भासवून गोमंतकीयांना धमकावले; उकळले 1.22 कोटी; कर्नाटक, गुजरातमधून संशयितांना अटक

Goa Land Bill: मोकाशे, आल्वारा, सरकारी जमिनीत घरमालकांना दिलासा! भू-महसूल कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेत मंजूर

Rashi Bhavishya 1 August 2025: गुंतवणुकीसाठी दिवस योग्य नाही,खर्चावर योग्य नियंत्रण आवश्यक; मित्रांकडून सहकार्य मिळेल

SCROLL FOR NEXT