Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Fuel Tax Update: पेट्रोल अन् डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन दर पंधरा दिवसांनी करांचा आढावा घेतला जाईल. याच्या मदतीने इंधनाच्या दरांचाही आढावा घेतला जाऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

FM On Fuel Tax: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली होती, त्यानंतर 15 दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधन (ATF) वर लागू केलेल्या नवीन कराचा आढावा घेतला जाईल. वास्तविक, आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन दर पंधरा दिवसांनी करांचा आढावा घेतला जाईल. याच्या मदतीने इंधनाच्या दरांचाही आढावा घेतला जाऊ शकतो.

अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, ही कठीण वेळ आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती बेलगाम झाल्या आहेत. आम्ही निर्यातीला परावृत्त करु इच्छित नाही, परंतु देशांतर्गत त्याची उपलब्धता वाढवू इच्छितो. जर तेल उपलब्ध नसेल आणि निर्यात होत राहिली, तर त्याचा काही भाग आपल्या नागरिकांसाठीही (Citizens) ठेवण्याची गरज आहे.

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावर कर

सरकारने पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाच्या निर्यातीवरही कर लागू करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर 6 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या (Diesel) निर्यातीवर 13 रुपये प्रति लिटर कर लावण्यात आला आहे. हा नवा नियमही 1 जुलैपासून लागू झाला आहे.

तेलावर कर

याशिवाय स्थानिक पातळीवर उत्पादित कच्च्या तेलावर ब्रिटनप्रमाणे कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर प्रतिटन 23,250 रुपये कर लावण्यात आला आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, नवा कर SEZ युनिट्सवरही लागू होईल, परंतु निर्यातीवर कोणतेही बंधन नाही. यासोबतच रुपयाच्या घसरणीवर अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुपयाच्या मूल्याचा आयातीवर काय परिणाम होतो याची सरकारला पूर्ण जाणीव आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT