petrol diesel price increased by 80 paise per litre today 26 march 2022 iocl city wise petrol price diesel rate updates Dainik Gomantak
अर्थविश्व

तेलाच्या किमती नियंत्रणाबाहेर, पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 'इतकं' महागलं

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार

दैनिक गोमन्तक

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज (शनिवार) 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या आठवड्यातील पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. अशाप्रकारे पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झाली आहे.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, आज (शनिवार) राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 98.61 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) 26 मार्च 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.51 रुपये वरून 113.35 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा (diesel) दर आता 96.70 रुपयांवरून 97.55 रुपये प्रति लिटर झाल आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे विकले जात आहे.

बालाघाटमध्ये पेट्रोलच्या दराने 113 रुपयांचा टप्पा पार केला आहे

पेट्रोलच्या वाढत्या दराने देशभरात उच्चांक गाठला आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पेट्रोलचा दर 113.03 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तर डिझेल ₹ 96.30 प्रति लिटर विकले जात आहे.

5 दिवसात किंमत 4 पट वाढली आहे

एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 5 दिवसात 4 वेळा वाढल्या आहेत. 22 मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 23 मार्च रोजी दोन्ही इंधनांच्या (OIL) किमती 80-80 पैशांनी वाढल्या होत्या. त्याच वेळी, 25 आणि 26 मार्च रोजी देखील तेल कंपन्यांनी राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात चढ-उतार होत आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT