petrol diesel price hike today 22 march 2022 iocl cities fuel rate increased 80 paise per liter know crude oil details  Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलने दिला मोठा धक्का

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

दैनिक गोमन्तक

देशात दीर्घकाळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज (मंगळवार) म्हणजेच 22 मार्च 2022 रोजी पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटरवरून 96.21 पर्यंत वाढली आहे. तर डिझेल 86.67 रुपयांनी महाग होऊन आता 87.47 रुपयांवर पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलर पर्यंत खाली आली असताना राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन तणावानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 130 डॉलरच्या पुढे गेली होती, त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नव्हती. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 मार्च 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.98 रुपये वरून 110.82 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलची किंमत 95 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे, जी 4 महिन्यांहून अधिक काळ 94.14 रुपये प्रति लिटरने विकली जात होती.

आज महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल

दिल्लीत पेट्रोलची किंमत - 96.21 रुपये प्रति लिटर

डिझेल - 87.47 रुपये प्रति लिटर

मुंबई पेट्रोल - 110.82 रुपये प्रति लिटर डिझेल - 95.00 रुपये प्रति लिटर

चेन्नई पेट्रोल - 102.16 रुपये प्रति लिटर डिझेल (Diesel) - 92.19 रुपये प्रति लिटर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT