Petrol, Diesel and LPG Gas Cylinder price hiked  Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोलसह LPG गॅसचाही भडका, सर्वसामन्यांना दिलासा नाहीच

दैनिक गोमन्तक

दिवसेंदिवस महागाईचा बोजा सामान्य जनतेवर अधिकच वाढताना दिसत आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे (Petrol- Diesel) दर दररोज वाढतच आहेत तर आज घरगुती गॅस सिलिंडरचे (LPG Gas) दरही वाढले आहेत.आता तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी आणखी 15 रुपये खर्च करावे लागणार आहेत.सरकारी तेल कंपन्यांनी (OIL Companies) विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढवले ​​आहेत. त्याच वेळी, यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. (Petrol, Diesel and LPG Gas Cylinder price hiked)

देशाची राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्येही एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत.

6 ऑक्टोबर रोजी विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत

दिल्ली - 899.5 रुपये

कोलकाता - 926 रुपये

मुंबई - 899.5 रुपये

चेन्नई - 915.5 रुपये

यापूर्वी दरवाढीचा विचार करता 1 सप्टेंबर रोजी 14.2 किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ झाली होती.त्याचबरोबर 18 ऑगस्ट रोजी देखील पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमती 25 रुपयांनी वाढवल्या होत्या.

1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीहि वाढवण्यात आल्या होत्या . दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1693 रुपयांवरून 1736.50 रुपये करण्यात आला होता तर कोलकात्यात 1805.50 रुपये, मुंबईत 1685.00 रुपये आणि चेन्नईमध्ये 1867.50 रुपये होते.

पेट्रोलच्या किमतीतही वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात दररोज कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम देशांतर्गत बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले ​​आहेत.IOCL च्या वेबसाइटनुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत 30 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. त्याचवेळी, डिझेलच्या किंमती प्रति लीटर 34 पैशांनी वाढल्या आहेत. आजच्या वाढीनंतर दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत आता 102.94 रुपये झाली आहे. याशिवाय डिझेलची किंमत 91.42 रुपये प्रति लीटर आहे. त्याचवेळी, मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत 25 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 30 पैशांनी वाढ झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT