गुरुवार, 30 सप्टेंबर, 2021 रोजी पुन्हा एकदा इंधनात दरवाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या (Crude oil) वाढत्या किंमतीमुळे आज तेल विपणन कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात तेलाचे भाव वाढवले ​​आहेत. Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ

मागील एका आठवड्यात पाच दिवस डिझेलचे (Diesel) दर वाढवण्यात आले आहेत. तर पेट्रोल (Petrol) दोन दिवस महाग झाले आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. बुधवारच्या शांततेनंतर, गुरुवार, 30 सप्टेंबर, 2021 रोजी पुन्हा एकदा इंधनात दरवाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या (Crude oil) वाढत्या किंमतीमुळे आज तेल विपणन कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात तेलाचे भाव वाढवले ​​आहेत. आज पेट्रोल 24 ते 25 पैशांनी महाग झाले आहे, तर डिझेल 30 ते 32 पैशांनी महाग झाले आहे. कच्चे तेल सध्या तीन वर्षांच्या उच्चांकावर चालले आहे. ज्यामुळे देशांतर्गत बाजारात तेलाच्या किंमती वाढू लागल्या आहेत. मात्र, बुधवारी बाजारात घसरण दिसून आली. काल, आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.57 टक्क्यांनी घसरून 77.90 डॉलर प्रति बॅरलवर आले.

मागील एका आठवड्यात पाच दिवस डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. तर पेट्रोल दोन दिवस महाग झाले आहे. या आठवड्याच्या वाढीनंतर डिझेल सुमारे दीड रुपयांनी महाग झाले आहे, तर पेट्रोल 40 ते 45 पैशांनी महाग झाले आहे.

देशातील कोणत्या राज्यात किती आहेत आजचे दर?

दिल्ली: पेट्रोल - ₹ 101.64 प्रति लिटर; डिझेल - 89.87 प्रति लिटर

मुंबई: पेट्रोल - ₹ 107.71 प्रति लिटर; डिझेल - 97.52 प्रति लिटर

कोलकाता: पेट्रोल - ₹ 102.17 प्रति लिटर; डिझेल - 92.97 प्रति लिटर

चेन्नई: पेट्रोल - 99.36 रुपये प्रति लीटर; डिझेल - 94.45 प्रति लिटर

बेंगळुरू: पेट्रोल - ₹ 105.18 प्रति लिटर; डिझेल - 95.38 प्रति लिटर

भोपाळ: पेट्रोल - ₹ 110.11 प्रति लिटर; डिझेल - 98.77 प्रति लिटर

लखनौ: पेट्रोल - 98.75 रुपये प्रति लीटर, डिझेल - 90.29 रुपये प्रति लीटर

पाटणा: पेट्रोल - ₹ 104.34 प्रति लिटर; डिझेल - 96.05 प्रति लिटर

चंदीगड: पेट्रोल - ₹ 97.85 प्रति लिटर; डिझेल - 89.61 रुपये प्रति लीटर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT