Cyber ​​Attack
Cyber ​​Attack Dainik Gomantak
अर्थविश्व

Cyber ​​Attack: लाखो भारतीयांचा पर्सनल डेटा विकला जातोय इंटरनेटवर, अहावालतून मोठा खुलासा

दैनिक गोमन्तक

Cyber ​​Attack: इंटरनेट युजर्सचा डेटा चोरुन ऑनलाइन विकल्या जाण्याच्या घटना नवीन नाहीत, पण भारतीय यूजर्स अशा प्रकरणांना सर्वाधिक बळी पडत आहेत. जगातील सर्वात मोठी VPN सेवा Nord VPN ने शेअर केलेल्या अहवालात असे सांगण्यात आले की, डेटा लीकमुळे भारताला मोठा फटका बसला आहे. येथील सुमारे 6 लाख यूजर्सचा पर्सनल डेटा बॉट मार्केटमध्ये विकला जात आहे.'

दरम्यान, मालवेअरच्या मदतीने चोरलेला यूजर्सचा डेटा हॅकर्सकडून बॉट मार्केटमध्ये विकला जात असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. चोरीला गेलेल्या डेटामध्ये यूजर्सचे लॉगिन डिटेल, कुकीज, डिजिटल फिंगरप्रिंट्स, स्क्रीनशॉट आणि इतर अशा माहितीचा समावेश आहे. यूजर्सच्या डिजिटल डेटाची सरासरी किंमत हॅकर्सनी $5.95 (सुमारे 490 रुपये) ठरवली आहे.

Nord VPN ने मागील 4 वर्षांचा डेटा ट्रॅक केला

अहवाल तयार करण्यासाठी, Nord VPN ने 2018 मध्ये Bot Markets लाँच केल्यापासून मागील 4 वर्षांचा डेटा ट्रॅक केला. Nord VPN च्या संशोधकांना असे आढळले की, सुमारे 81,000 डिजिटल फिंगरप्रिंट्स आणि 538,000 ऑटोफिल फॉर्ममधील डेटा 667 दशलक्ष कुकीज व्यतिरिक्त बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय, हॅकर्सकडून डिव्हाइसचे अनेक स्क्रीनशॉट आणि वेबकॅम स्नॅप्स देखील विकले जात आहेत.

सायबर गुन्हे भारतासाठी मोठा धोका बनले आहेत

सायबर गुन्ह्यांची प्रकरणे भारतातील (India) एजन्सींना नेहमीच त्रास देत असून ही एक मोठी समस्या आहे. अलीकडेच, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे अनेक सर्व्हर हॅक झाले होते. या हल्ल्याच्या अवघ्या एका आठवड्यानंतर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेवर (IMCR) 24 तासांत सुमारे 6,000 हॅकिंग हल्ले करण्यात आले आणि त्याच्या सर्व्हरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT