जागतिक बँकेने आता गरिबीच्या संदर्भात एक नवे मानक ठरवले आहे. जर एखादी व्यक्ती दररोज 167 रुपये ($2.15) पेक्षा कमी कमवत असेल तर तो गरीब समजला जाईल. चलनवाढ, राहणीमानाच्या खर्चात झालेली वाढ, दारिद्र्यरेषेसह अनेक बाबींच्या आधारे जागतिक बँक वेळोवेळी डेटा बदलत असते.
दरम्यान, युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे जगभरात महागाई (Inflation) वाढली आहे. या दरम्यान अनेक गोष्टी बदलल्या. मात्र, सध्या 2015 च्या आकडेवारीच्या आधारे मूल्यांकन केले जाते. जागतिक बँक या वर्षाच्या अखेरीस हे नवीन मानक लागू करेल.
भारतात आठ वर्षांत गरिबी 12.3 टक्क्यांनी कमी झाली
जागतिक बँकेच्या (World Bank) धोरण अहवालात म्हटले आहे की, आठ वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गरिबी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्चच्या वर्किंग पेपरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, भारताने गरिबी जवळजवळ संपवली आहे. यासह, देशातील उपभोग असमानता 40 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे. 2011 मध्ये गरिबीचा दर 22.5 टक्के होता, जो 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर पोहोचला. अहवालानुसार, भारताच्या ग्रामीण भागात गरिबीत मोठी घट नोंदवली गेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.