Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

Pension Update: लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळवायची असेल तर...!

Pension News Update: तुम्हालाही पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळवायची असेल तर आता तुमच्याकडे फक्त 1 दिवस शिल्लक आहे.

Manish Jadhav

Pension News Update: पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हालाही पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळवायची असेल तर आता तुमच्याकडे फक्त 1 दिवस शिल्लक आहे. होय... तुम्हाला अधिक पेन्शन मिळवण्याची संधी आहे.

याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन मिळण्याचा पर्याय दिला जातो.

आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 1 शिल्लक आहेत. तुम्ही 3 मे 2023 पर्यंत हाय पेन्शनसाठी अर्ज करु शकता.

ईपीएफओने माहिती दिली

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने सांगितले की, अधिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही 3 मे 2023 पर्यंत अर्ज करु शकता.

ईपीएफओने अर्जाची तारीख वाढवली आहे. यापूर्वी, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च होती, मात्र आता सरकारने (Government) ती दोन महिन्यांसाठी वाढवली आहे.

तुम्ही जास्त पेन्शनचा पर्याय निवडू शकता

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्य त्यांच्या नियोक्त्यांसोबत 3 मे 2023 पर्यंत अधिक पेन्शनसाठी संयुक्तपणे अर्ज करु शकतील.

त्यांना यासाठी रिटायरमेंट फंड ऑर्गनायझेशनच्या एकात्मिक सदस्य पोर्टलवर अर्ज करावा लागेल.

पूर्वी असे मानले जात होते की, 3 मार्च 2023 ही अधिक अंतिम तारीख होती. EPFO च्या युनिफाइड मेंबर पोर्टलवर अलीकडेच सक्रिय केलेली URL स्पष्टपणे दर्शवते की, अधिक पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडण्याची अंतिम तारीख 3 मे 2023 आहे.

2014 मध्ये पेन्शनमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती

गेल्या आठवड्यात EPFO ​​ने आपल्या प्रक्रियेचा तपशील जारी केला. असे सांगण्यात आले की, भागधारक आणि त्यांचे नियोक्ते संयुक्तपणे कर्मचारी पेन्शन योजने (EPS) अंतर्गत अधिक पेन्शनसाठी अर्ज करु शकतात.

नोव्हेंबर 2022 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन (Pension) योजना, 2014 वर शिक्कामोर्तब केला.

यापूर्वी, 22 ऑगस्ट 2014 च्या EPS सुधारणेने पेन्शनपात्र वेतन मर्यादा 6,500 रुपये प्रति महिना वरुन 15,000 रुपये प्रति महिना केली होती.

तसेच, सदस्य आणि त्यांच्या नियोक्त्यांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या 8.33 टक्के EPS मध्ये योगदान देण्याची परवानगी होती. ईपीएफओने यासंदर्भात त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना एक परिपत्रक जारी केले आहे.

याआधी, सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या आदेशात म्हटले होते की, EPFO ​​ला सर्व पात्र सदस्यांना अधिक पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल.

हा चार महिन्यांचा कालावधी 3 मार्च 2023 रोजी संपेल. यावरुन याची अंतिम मुदत 3 मार्च 2023 असल्याचे समजले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog: "नशिबाची साथ अन् पैशांचा पाऊस!" नवपंचम राजयोग बदलणार 'या' 3 राशींचं भाग्य; करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

Indian Super League 2026: एफसी गोवा कोलकात्यात पुन्हा वरचढ? ईस्ट बंगालविरुद्ध रंगणार आयएसएल फुटबॉल सामना

IND vs ENG Pitch Report: "वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार?" ओपनर्सचा धमाका की स्विंगचा तडाखा; हाय-व्होल्टेज सेमीफायनलमध्ये टॉस ठरणार गेम चेंजर

SCROLL FOR NEXT