car  Dainik Gomantak
अर्थविश्व

...म्हणून प्रवासी वाहनांच्या विक्रीत 4 टक्क्यांनी घट

मार्च महिन्यामध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट झालेली दिसून आली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पण मार्च महिन्यामध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत मोठी घट पाहायला मिळली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांची संघटना असलेल्या सियामने (SIAM) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2021 च्या तुलनेत देशातील प्रवासी वाहनांची विक्री 4 टक्क्यांनी घसरून 2,79,501 युनिट्सवर आली आहे. मार्च 2021 मध्ये ऑटोमोबाईल कंपन्यांनी 2,90,939 प्रवासी वाहने विकली होती.

सियामच्या अहवालानुसार मार्चमध्ये दुचाकींच्या विक्रीतही घट दिसून आलीआहे. मार्च 2022 मध्ये, दुचाकी वाहनाची विक्री 21 टक्क्यांनी घसरून 11,84,210 युनिट झाली, तर मार्च 2021 मध्ये एकूण 14,96,806 दुचाकींची विक्री झाली. या कालावधीत दुचाकी वाहनाची विक्री 9,93,996 युनिट्सवरून 21 टक्क्यांनी घसरून 7,86,479 युनिट्सवर आली आहे. स्कूटरच्या विक्रीतही घट झालेली आहे. स्कूटरची विक्री 21 टक्‍क्‍यांनी घसरून 3,60,082 युनिट्सवर आली आहे. मागील वर्षी याच महिन्यांमध्ये दुचाकी निर्मात्यांनी (Vehicle) 4,58,122 युनिट्सची केली होती. वाहनांची एकूण विक्री 2021-22 मध्ये 13 टक्क्यांनी वाढून 30,69,499 वाहनांवर पोहोचली आहे. जी 2020-21 मध्ये 27,11,457 वाहने इतकी होती. पण गेल्या आर्थिक वर्षात दुचाकींची एकूण विक्री 11 टक्क्यांनी घसरून 1,34,66,412 इतकी झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात दुचाकींची विक्री 1,51,20,783 युनिट्स इतकी झाली होती.

आर्थिक वर्षात तीन चाकी वाहनांची विक्री वाढून 2,60,995 युनिट्स झाली आहे. जी मागील आर्थिक वर्षात 2,19,446 युनिट्स होती. व्यावसायिक वाहनांची विक्री 5,68,559 युनिट्सवरून 7,16,566 युनिट्सपर्यंत वाढली. 2021-22 आर्थिक वर्षात विविध सेगमेंटमधील वाहनांची एकूण विक्री 1,75,13,596 युनिट्सवर घसरली. वाहन विक्रीचा एकूण आकडा 2020-21 मध्ये 1,86,20,233 युनिट्स एवढा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT