Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, राष्ट्रपतींचे होणार अभिभाषण

Parliament Budget Session: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे.

दैनिक गोमन्तक

Parliament Budget Session 2023: देशाच्या 2023-24च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात होणार आहे. उद्या बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करतील.

त्याआधी आज संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अभिभाषण करणार आहेत. तर सीतारमण या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत.

या वर्षाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे खुप खास असणार आहे. मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये कुठल्या गोष्टी महाग होणार कुठल्या गोष्टी स्वस्त: होणार या कडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. या सोबतच नवे कर किंवा करवाढ या सारख्या बाबी देखील महत्वाच्या ठरणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज तब्बल 66 दिवस सुरू राहणार आहे. 31 जानेवारी ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा हा 13 मार्चपासून सुरू होणार आहे.

आज अभिभाषणा दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करणार असून त्यानंतर सीतारमण या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करतील. उद्या 1 फेब्रुवारी रोजी त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

यावर्षी कर उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ होणार आहे. पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही नवा कर लागणार नाही.

भारताची अर्थव्यवस्था आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये चढ-उतार होत असतानाही देश वेगाने प्रगती करत असल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT