online fraud  Dainik Gomantak
अर्थविश्व

सावधान! आधार-पॅन कार्डचे डिटेल्स शेअर केल्यास होऊ शकते GST ची चोरी

आधार-पॅन कार्डच्या डिटेल्सचा वापर करून अनेक बनवट कंपण्यांच्या माध्यमातून जीएसटीची फसवणूक केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन फ्रॉड अधिक वाढले आहेत. आधार आणि पॅन कार्डशिवाय आपली अनेक कामे होऊ शकत नाही. या दोन्ही कागदपत्रामध्ये आपल्या बँकेशी संबंधित माहिती असते. या कार्डशिवाय तुम्ही बँकेत खाते उघडू शकत नाही.आधार आणि पॅन कार्डच्या अधिक वापरासह फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जर तुम्ही विचार न करता पॅन आधारची माहिती दिली तर ते तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. GST चुकवण्यासाठी फसवणूक करणारे या दोन कागदपत्रांचा वापर करू शकतात.

आधार आणि पॅन कार्डच्या (Pan Card) अधिक वापरासह फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जर तुम्ही विचार न करता पॅन आधारची माहिती दिली तर ते तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. GST चुकवण्यासाठी फसवणूक करणारे या दोन कागदपत्रांचा वापर करू शकतात.

* सीबीआयसीने दिली माहिती

आधार कार्डची डिटेल्स शेअर केल्यास जीएसटी (GST) ची चोरी होऊ शकते अशी माहिती सीमा शुल्क मंडळाने दिली आहे. CBIC ला सांगण्यात आली आहे की सायबर गुन्हे करणारे लोक तुमची बँक तपशील आणि GST माहिती तुमच्या पॅन आणि आधारवरून घेउ शकतात. यानंतर ते तुमच्या कागदपत्राचा वापर करून बनावट कंपनी तयार करून जीएसटी चोरू शकतात. या प्रकरणाची माहिती देताना सीबीआयसीने सांगितले की, तुमच्या पॅन आणि आधारच्या माहितीच्या माध्यमातून लोक बनावट कंपनी बनवून गुन्हेगारी जीएसटी चुकविण्याचे काम करत आहे. बनवट कंपनीमार्फत इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दावा करून करचोरी केली जात आहे. CBIC ने लोकांना ही माहिती दिली आहे की तुम्ही अनावश्यकपणे तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका.

* अनेक युजर्सची फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून पॅन कार्ड आणि आधार कार्डचा वापर करून अनेक फसवणूक करणाऱ्या कंपन्यानी जीएसटी टाळला आहे. यासोबतच आधार कार्डद्वारे ट्रांजैक्शन करून अनेक युजर्सची फसवणूक झाली आहे. यामुळे पॅन आणि आधार कार्डची डिटेल्स कोणसोबतही शेअर करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT