PAN-Aadhaar Linking Dainik Gomantak
अर्थविश्व

PAN-Aadhaar Linking: 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड करा आधारशी लिंक, अन्यथा ....

सरकारने आधारशी पॅन लिंक करणे अनिवार्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास अनिवार्य केले आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. एकूण ६१ कोटी पॅनपैकी ४८ कोटी आतापर्यंत आधारशी लिंक केले आहे आणि ज्यांनी ३१ मार्चपर्यंत तसे केले नाही त्यांना व्यवसाय आणि टॅक्स संबंधित लाभ मिळणार नाही.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्ससचे (CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी रविवारी सांगितले की, अनेक कोटी पॅन अद्याप आधार कार्डशी लिंक झालेले नाही. परंतु हे काम 31 मार्चच्या अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

  • आधारशी लिंक नसलल्यास वैयक्तिक पॅन होईल बंद

31 मार्च 2023 नंतर निष्क्रिय घोषित केले जातील. आधारशी लिंक नसलेले वैयक्तिक पॅन या 31 मार्च 2023 नंतर निष्क्रिय घोषित केले जातील. यासोबतच सरकारने म्हटले आहे की, सध्यापासून 31 मार्चपर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

पॅन आधारशी लिंक करण्याबाबत अनेक जागरुकता मोहिमा राबवण्यात येल्या सीबीडीटी प्रमुख म्हणाले, " पॅन आधारशी लिंक करण्याबाबत अनेक जागरूकता मोहिमा राबवल्या गेल्या आहेत आणि आम्ही ही मुदत अनेक वेळा वाढवली आहे.

जर आधार हे दिलेल्या वेळेपर्यंत पॅनशी लिंक केले नाही, तर त्या धारकाला टॅक्समधील लाभ मिळू शकणार नाहीत. सीबीडीटीने गेल्या वर्षी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले की एकदा पॅन निष्क्रिय झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्राप्तिकर कायद्यांतर्गत विहित केलेल्या सर्व परिणामांना सामोरे जावे लागेल. यामध्ये आयकर रिटर्न न भरणे आणि प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया न करणे यासारख्या परिस्थितींचा समावेश आहे.

  • PANला कॉमन आयडेंटिफायर बनवण्याची घोषणा

पॅनला कॉमन आयडेंटिफायर बनवण्याच्या घोषणेसोबतच पॅनला कॉमन आयडेंटिफायर बनवण्याची अर्थसंकल्पीय घोषणा व्यवसाय जगतासाठी फायदेशीर ठरेल, असे ते म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले आहे की व्यावसायिक आस्थापने आता सरकारी संस्थांच्या डिजिटल प्रणालीमध्ये पॅन वापरण्यास सक्षम असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT