गेल्या काही वर्षांत, उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून EV चा प्रचार केला जात आहे. यासाठी सरकारकडून ही वाहने खरेदी करणाऱ्यांना अनुदान दिले जात आहे. देशात 18 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने (EV) नोंदणीकृत आहेत. ईव्हीची सर्वाधिक विक्री होणारी राज्ये उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्र आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ४,१४,९७८ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापाठोपाठ दिल्ली (1,83,074) आणि महाराष्ट्र (1,79,087) आहे. देशात 5,151 सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन आहेत. यातील सर्वाधिक तामिळनाडू (560) आहेत. दिल्ली (539) दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय
गोव्यात मात्र EV बाबतीत थोडी वेगळी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली होती. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना 2025 -2026 पर्यंत सुरू राहील, असेही सरकारने सांगितले होते. अर्थसंकल्प सादर होऊन अवघे तीन महिने झाले असताना सदर योजना मागे घेण्याची वेळ सरकारवर आली आहे.
काही जास्त मायलेजच्या कार - मुंबईतील इलेक्ट्रिक कार उत्पादक PMV Electric कंपनीने भारतात नुकतीच PMV Ease ही कार लॉन्च केली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 4.79 लाखांपासून सुरु होत असून कारमध्ये 48V लिथियम आयऑन बॅटरी देण्यात आली आहे. या कारमध्ये वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार जवळपास 120, 160 आणि 200 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.
Tata Tiago EV कंपनीचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही एक इलेक्ट्रिक हॅचबॅक कार असून कंपनीने प्रकारात लॉन्च केली आहे. या कारमध्ये 19.2kWh आणि 24 kWh क्षमतेच्या दोन बॅटरीचा पॅक देण्यात आला असून ही कार एकदा चार्ज केल्यावर 250 आणि 315 किमीपर्यंत धावू शकते.
महिंद्रा ई व्हेरिटो ही एक इलेक्ट्रिक सेडान कार आहे. या कारच्या दोन व्हेरिएंट कंपनीने बाजारात आणल्या आहेत, ज्यात D2 आणि D4 या व्हेरिएंटचा समावेश आहे. या कारमध्ये 288Ah ची लिथियम आयऑन बॅटरी देण्यात आली असून 72V ची इलेक्ट्रिक मोटरही देण्यात आली आहे. ही कार प्रतितास 86 किमीच्या टॉप स्पीडने धावू शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.