Piyush Goyal ANI
अर्थविश्व

वस्त्रोद्योग क्षेत्र पाच वर्षांत 250 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार, शेतकऱ्यांना फायदा होणार- पीयूष गोयल

वस्त्रोद्योग क्षेत्राला आधार देणाऱ्या भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ या राज्याला मिळत राहील

दैनिक गोमन्तक

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी शनिवारी विशेष घोषणा केली. "आमचे वस्त्रोद्योग क्षेत्र पुढील पाच वर्षांत 250 अब्ज डॉलरचा उद्योग उभारणार. यातील 40 टक्के निर्यात होणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. कोविड-19 च्या संपूर्ण काळात सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला पाठिंबा दिला आहे. त्यांनी या क्षेत्राला 20 टक्के अतिरिक्त कोलेटरल मुक्त कर्ज आणि पाच टक्क्यांपर्यंत व्याज सवलत दिली आहे. गेल्या वर्षांत आलेल्या अनेक योजनांचा तामिळनाडू सर्वात मोठा लाभार्थी आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राला आधार देणाऱ्या भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ या राज्याला मिळत राहील," असे गोयल म्हणाले.

वस्त्रोद्योग क्षेत्रात करोडो नोकऱ्या निर्माण होतील : गोयल

गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी लवकरच आणखी एक प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना आणण्याचा विचार करत आहोत. त्याचा तपशील लवकरच तुमच्या सर्वांशी शेअर केला जाईल. यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात करोडो नोकऱ्या आणतील, जेणेकरून लोकांना चांगले जीवन मिळू शकेल आणि आमच्या शेतकर्‍यांना त्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल.

याआधी एप्रिलमध्ये सरकारने माहिती दिली होती की कापड क्षेत्रासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (PLI योजना) अंतर्गत विविध कंपन्यांनी दिलेल्या 61 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावांमध्ये एकूण 19 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आहे. सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, या कंपन्यांमध्ये गिनी फिलामेंट, किम्बर्ले क्लार्क इंडिया आणि अरविंद यांचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत सरकारकडे एकूण 67 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 61 मंजूर झाले आहेत. 61 प्रस्तावांमध्ये एकूण 19,077 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची चर्चा करण्यात आली आहे. त्यांची अंदाजे उलाढाल 184,917 कोटी रुपये आहे आणि 2.4 लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे. सरकारने MMF परिधान, MMF फॅब्रिक आणि तांत्रिक कापड यांसारख्या कापड उत्पादनांसाठी PLI योजना मंजूर केल्या होत्या, असे या योजनांच्या मंजुरीबाबत माहिती देताना वस्त्रोद्योग सचिव यूपी सिंह म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

Video: लष्करी अधिकाऱ्याची दादागिरी! श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा मोडला

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT